22 October 2021 12:35 PM
अँप डाउनलोड

आ. निलेश लंकेचं पुढील भविष्य अतिशय उज्ज्वल | राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांना मोठी संधी मिळणार - अमोल मिटकरी

MLA Nilesh Lanke

पारनेर, १९ सप्टेंबर | कोरोनाच्या काळात सर्व रुग्णालये फुल असताना आ. निलेश लंके यांनी कोवीड सेंटर सुरु करून हजारो लोकांचे प्राण वाचवत अनेक कुटुंब उद्धवस्त होण्यापासून वाचवले. आमदार लंके यांचे पुढील भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. राष्ट्रवादीला एक साजेसा आमदार लोकांनी दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आमदार निलेश लंके यांना मोठी संधी मिळणार असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे विधान परीषद अध्यक्ष अमोल मिटकरी यांनी केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आ. निलेश लंकेचं पुढील भविष्य अतिशय उज्जवल, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांना मोठी संधी मिळणार – MLA Nilesh Lanke will get more responsibility in NCP party says MLA Amol Mitkari :

नगर तालुक्यातील वडगाव गुफ्ता येथील सीना नदीवरील पुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी म्हणाले कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासळली असताना देखील आमदार लंके यांनी मतदार संघात शंभर कोटी रुपयाच्या निधीचे काम आणले.

त्यांची काम करण्याची पध्दत पाहून त्यांची कोणीही बरोबरी करु नये. राष्ट्रवादीला स्व. आर.आर. आबा याची उणीव होती ती निलेश लंके याच्या रूपाने भरूण निघाल्याचा भास होतो. निलेश लंके यांनी मतदार संघात विकासाची गंगा आणली. त्याच्या कामाची पध्दत पाहून विद्यार्था त्यांच्या नावावर पीएचडी करतील. साधा झोपडीत राहणारा नेता महाराष्ट्राचे भविष्य असेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही एवढे काम लंके यांनी केले अशी स्तुती देखील त्यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: MLA Nilesh Lanke will get more responsibility in NCP party says MLA Amol Mitkari.

हॅशटॅग्स

#NileshLanke(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x