20 April 2024 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

राष्ट्रवादीचे आमदार घरीच; कारण सगळ्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केला...बाकी सलाम त्या?

MLA Jitendra Awhad, NCP

मुंबई: राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे काल शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना काल रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केली आहे.

शिवसेनेचे ५६ आमदार अधिक शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे येथील या हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबणार आहेत. दरम्यान, काळजीवाहू सरकारची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने सत्तास्थापनेचा पेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना सोडवावाच लागणार आहे. त्यादृष्टीने आज हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, रात्री उशिरा युवासेना अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी रंगशारदा हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व शिवसेना आणि समर्थक अपक्ष आमदारांची हॉटेलमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट दिली आणि परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यानंतर आज नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार ते पाहावं लागणार आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे सर्व आमदार जयपूरमध्ये वास्तव्य करणार असल्याचं वृत्त आहे. एकाबाजूला असं चित्र असल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक मजेशीर ट्विट शेर करत, “हा मेसेज करणाऱ्याला सलाम” असं देखील म्हटलं आहे.

काय आहे ते नेमकं ट्विट;

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x