21 November 2019 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पवारांचा शिवसेना आणि भाजपाला मोलाचा सल्ला

NCP, Sharad Pawar, Ramdas Athavale

मुंबई: सत्ता स्थापनेचा तिढा दोन आठवड्यांनंतरही सुटत नसल्यानं राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली कोंडी सोडवण्याबद्दलचा सल्ला घेण्यासाठी पवारांची भेट घेतल्याचं आठवलेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

यावेळी आठवले म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मी आलो होतो. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. राजकीय स्थरावर आम्ही वेगळे असलो तरी व्यक्तीगत पातळीवर आमचे घनिष्ठ संबंध आहेत. राजकीय वातावरण बिघडलेले असल्यामुळे त्यावर तोडगा निघने जरुरीचे आहे. शरद पवार यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे.

‘राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेनेला सरकार स्थापनेचा कौल दिला आहे. त्याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा. आम्ही तो पेच सोडवू शकत नाही. त्यांनीच समंजसपणा दाखवायला हवा,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिला.

विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असल्यानं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याबाबत भाजप, शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरू असतानाच महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या