14 December 2024 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मोदी सरकारकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा जगभर पुरवठा; आता मुंबईतल्या रुग्णालयांना तुटवडा

Covid19, Corona Crisis, hydroxychloroquine tablets

मुंबई, ११ एप्रिल: सर्व जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. २०० पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहेत. जगाची महासत्ता असलेला अमेरिका यात सर्वाधिक भरडला जातोय. अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसला असून कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजुनतरी दिसत नाहीत. कोरोनाविरुद्ध औषध शोधण्यात अमेरिकेने पूर्ण जोर लावला आहे.

दरम्यान, भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

मात्र भारताकडून जगभरात पाठवलं जाणारं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मुंबईतल्या सरकारी रुग्णालयांमधल्या कित्येक कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस घेणं गरजेचं आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या कित्येक रुग्णालयांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

कोरोना रुग्णांच्या थेट संपर्कात येणारे पालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी आणि काही रुग्णांचे नातेवाईक यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र त्यांना हे औषध पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अनेक कर्मचाऱ्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या तिसरा डोस घेता येत नसल्याची माहिती सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरनंच दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

 

News English Summary: However, it has been shocking to know that many employees are not available at Government hospitals in Mumbai, which is being sent worldwide by India. Employees treating corona patients need to take a dose of hydroxychloroquine. However, Hydroxychloroquine is not sufficiently available in many hospitals of Mumbai Municipal Corporation.

News English Title: Story corona virus hydroxychloroquine tablets Covid19 unavailable BMC doctors News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x