19 May 2024 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

पगार मिळावा आणि घरी जाण्याची परवानगी सुद्धा; सुरतमध्ये कामगारांकडून जाळपोळ

Corona Crisis, Covid19, Surat Migrant Workers

सुरत, ११ एप्रिल: गुजरातमधील सुरतमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा हजारो स्थलांतरित कामगार रस्त्यावर उतरले, या कामगारांनी हातगाड्यांची जाळपोळ आणि इतर सार्वजनिक संपत्तीची तोडफोड केली. पगार मिळावा तसेच घरी जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करत, कामगारांनी दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ६०- ७० लोकांना ताब्यातही घेतले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सूरतच्या लसकाना आणि डायमंड बुर्स भागात लॉकडाऊनमुळे हैराण झालेले शेकडो प्रवासी मजूर रस्त्यावर उतरले. या भागात प्रवासी मजुरांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्याला वेतन दिलं जावं आणि आपापल्या घरी जाण्यासाठी योग्य त्या सोई-सुविधा पुरवल्या जाव्यात, अशी हे मजूर मागणी करताना दिसले.

यापैकी बरेच कामगार वस्त्रोद्योग फॅक्टरीत काम करतात. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर या फॅक्टरी बंद पडल्या असून कामगारांच्या हातात काहीच काम नाही. तसंच वाहतूक बंद असल्याने त्यांच्या घरी जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. यामधील अनेक कामगार ओडिशाचे नागरिक आहेत.

 

News English Summary: Thousands of migrant workers took to the streets late Friday night in Surat, Gujarat, to disperse their vehicles and other public property. Police said that the workers were stoned, demanding salary and permission to go home. Police have also arrested 60-70 people.

News English Title: Story Migrant workers protest demanding salaries and asking for permission to go homes in Gujarat Surat city News Latest Updates

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x