30 April 2025 8:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

तहसीलदार ज्योती देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप | विभागीय आयुक्तांचा अहवाल | २०२० पासून होत्या वादात... म्हणून बनाव?

MLA Nilesh Lanke

पारनेर, २० ऑगस्ट | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून आपल्या बचावासाठी केविलवाणा प्रयत्न केलाचा पलटवार निलेश लंके यांनी केलाय.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे, असं निलेश लंके यांनी म्हटलंय. यापूर्वी देखील जेव्हा तहसीलदार देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा तहसीलदारांना सूचना केल्या तर त्यांनी मला देखील आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री अपरात्री केल्याचा आरोप लंके यांनी केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न केल्याचं आमदार लंके यांनी म्हटलंय. निलेश लंके यांच्या या उत्तरावरुन आता हे प्रकरण कुठलं वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एकंदर तहसीलदार देवरे यांची पारनेरमधील कारकीर्द दोन वर्षांपासून वादळी ठरते आहे. (NCP MLA Nilesh Lanke’s answer on audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore) :

प्रसार माध्यमांच्या समोर आलेला जुना इतिहास:

२०२० म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तहसीलदार ज्योती देवरे वादात:
पारनेर महसूल विभागात कोरोनाच्या काळातही राजकारण सुरू होतं . तहसीलदार विरूद्ध तलाठी असा संघर्ष तेथे पेटला होता. तहसीलदार ज्योती देवरे यांचे म्हणणे होते की, तलाठी नियुक्तीच्या ठिकाणी रहात नाहीत, तर कर्मचारी म्हणतात तहसीलदार मॅडम मनमानी करतात. पगार नसतानाही आम्ही निवारा केंद्र चालवतो, याचे त्यांना काहीच वाटत नाही. सॅनिटायझरसारख्या सुविधाही पुरवल्या जात नाहीत.

मॅडम हेकेखोर आहेत:
कर्मचारी म्हणतात, तहसीलदार मॅडम या हेकेखोर आहेत. त्यामुळे काम करताना परिणाम होतो. त्या कर्मचाऱ्यांना सारख्या निलंबित करण्याची धमकी देतात, यामुळेच त्यांच्याविरोधात असंतोष आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार:
तहसीलदार देवरे यांनी तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष विनायक निंबाळकर यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. चार माणसांत त्यांनी, तुम्ही टिटवीचे मटण खाता की काय मॅडम…असे विचारून विचारून अपमान केला. तसेच बदली करणार असल्याचेही सांगितले. तहसीलदार यांनी तक्रार केल्यानंतर तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच त्यांचे गाऱ्हाणे केले आहे. त्यावर ४५जणांच्या सह्या आहेत.

आमदार लंके समर्थकांसोबतही खटके:
प्रशासकीय कामातील असहकार्यामुळे तहसीलदार देवरे यांचे आणि आमदार नीलेश लंके यांच्या समर्थकांतही खटके उडाले होते. बेवारस पडलेल्या धान्याच्या कारवाईवरून त्यावेळी हा वाद पेटले होता. त्यानंतर काहींनी माहिती अधिकारात तहसीलदार सरकारी वाहनाचा दुरूपयोग करीत असल्याचे आरोप केले होते. एकंदर तहसीलदार देवरे यांची पारनेरमधील कारकीर्द दोन वर्षांपासून वादळी ठरते आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP MLA Nilesh Lanke’s answer on audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NileshLanke(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या