औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरवात केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू केली आहे. या यात्रेत खा. कोल्हे आपल्या पक्षाला बळ देणार असून राज्यातील जनतेला विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या भूमिका समजावून सांगत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या बहुउद्देशीय या ‘शिवस्वराज्य यात्रेत’ गटबाजी असल्याचं समोर आलं होतं. तर पक्षातील काही नेत्यांना विश्वासात व विचारात न घेता या यात्रेचे आयोजन केले असल्याची कुजबुज पक्षात सुरु असल्याचं बोललं जात होत.

इतिहासाची पुनरावृत्ती होतात असे म्हणतात. ८४ साली शरद पवारांना आजच्या सारखेच लोक सोडून जात होते मात्र गेले त्यापेक्षा दुप्पट आमदार पवारसाहेबांनी निवडून आणले. पानगळ गळली की नव्याने पालवी फुटते तशीच पानगळ जावून नवी पालवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून फुटली आहे असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत मांडले.

यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला. आपली यात्रा सुरू झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा संपुष्टात आणली. गंगापूरचे स्थानिक आमदारांनी असे भाष्य केले की आश्वासन फक्त द्यायचे असते पूर्ण करायचे नसते. या वाक्याचा हिशोब येत्या विधानसभा निवडणुकीत करा. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा येत्या काळात बदल घडवून शिवस्वराज्य स्थापन करण्यास सिंहाचा वाटा द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला