3 May 2024 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते - तज्ज्ञांचा इशारा

Maharashtra corona pandemic

मुंबई, २९ एप्रिल | देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा 1.5 कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लोक रिकव्हर झाले होते. ओव्हरऑल रिकव्हरी रेटमध्येही 1.8% ची वाढ झाली आहे. हा आता 82.08% झाला आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी बुधावारी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे. राज्य सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी अनेकदा पुरेश्या प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. राज्यामध्ये सध्ये लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलीय तर जिथे लसीकरण सुरु आहे तिथेही लसींच्या कमतरतेची चिंता व्यक्त केली जातेय. एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसींचा डोस दिल्यानंतरच करोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

 

News English Summary: A slowdown in vaccination in Maharashtra could lead to a third wave of corona in the state. Health experts on Wednesday issued a warning regarding the Corona situation in Maharashtra. Concerns have been raised after the state government announced that vaccinations for people between the ages of 18 and 44 have been postponed from May 1 due to insufficient availability of vaccines.

News English Title: Maharashtra may face third wave of corona if vaccination will go slow said experts news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x