राष्ट्रवादीला खेड्यापाड्यांत पोहोचवण्यासाठी पवारांनी सांगितला मास्टर प्लान | दिला हा सल्ला
मुंबई, १२ डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस (NCP President Sharad Pawar’s 80th Birthday) आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला गावागावात पोहोचविण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. गावागावात आधुनिकता आणि विज्ञानाच्या विचारांची पिढी निर्माण करण्याचं काम आपल्या पक्षानं करायला हवं, असं शरद पवार म्हणाले. जीवनामध्ये आपली विचारधारा केव्हाच बदलू नये. जीवनाचे जे सूत्र आपण स्वीकारले त्याच रस्त्याने अखंड चालत राहण्याचा प्रयत्न करत राहायला हवा, असंही ते आवर्जुन म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यातील गावागावात पोहोचविण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराच्या दृष्टीनं काम करायला हवं, असं पवार म्हणाले. “महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच नुसता उल्लेख करुन चालणार नाही. त्यांनी दिलेल्या दृष्टीवर चालण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. महात्मा फुले खेड्यात जन्माला आले असले तरी त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार केला. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंचा आधुनिक दृष्टीकोन स्वीकारला”, असं शरद पवार म्हणाले. We have to work from the point of view of Phule-Shahu-Ambedkar to take the NCP to the villages of the state, said Sharad Pawar.
याचं दरम्यान शरद पवार यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबतची एक महत्वूपर्ण गोष्टी सांगितली. ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून देशाचा पाया रचला हे सर्वांना माहित आहेच. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्यापूर्वीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात जलसंपदा आणि वीज मंत्री होते हे बहुदा कुणाला माहित नसावं. देशात सुबत्ता आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी पाण्याचा संचय करायला हवा. यासाठी धरणं बांधायला हवीत. त्यावर जलविद्युत प्रकल्प राबवले गेले पाहिजेत हे विचार त्यांनी प्रत्यक्षात आणले. भाक्रा नांगल धरण हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.”
News English Summary: Today is the 80th birthday of NCP President Sharad Pawar. On this occasion, a special program was organized by NCP at Yashwantrao Chavan Hall in Mumbai. In his speech, Sharad Pawar thanked everyone for their good wishes and appealed to the party workers to take the NCP to the villages. Sharad Pawar said that his party should work to create a generation of modernity and scientific ideas in every village.
News English Title: NCP President Sharad Pawar speech on his 80th birthday News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा