15 December 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

दानवेंची जीभ कापा | १२ लाखाची गाडी आणि १० लाख रोख मिळवा | सेना पदाधिकाऱ्याची घोषणा

Yavatmal, shivsena leader Santosh Dhavale, BJP MP Raosaheb Danve

यवतमाळ, १२ डिसेंबर: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान-चीनचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी येथील दत्त चौकात शिवसैनिक एकत्र आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ‘लोकमत’ वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या आंदोलनाबाबत यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्राला सांगितले की, ”आंदोलनाच्या दहा मिनिटपूर्वी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आलेला एक इसम भेटला. आपल्याला रक्ताची गरज आहे, रक्त मिळत नाही, भारतीय जनता पक्षाकडे गेलो तर ते शिव्या देतात, तुम्ही लोक आंदोलन करत नाही, मस्त गाड्यांमध्ये फिरता, अशा शब्दात त्यांनी सुनावले. त्यांच्या वक्तव्याने आपण क्षणात एक निर्णय घेतला. आपल्याला शेतकऱ्यांच्या मुलांनी लोकवर्गणी करून चारचाकी वाहन पक्ष कार्यासाठी व समाजसेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे.

त्यामुळं शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच हे १२ लाखांचे वाहन भेट देऊ,” त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नव्हे तर त्याला आणखी १० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले (Whoever cuts off the tongue of Raosaheb Danve, who made controversial statements about farmers, we will immediately give him a vehicle worth Rs 12 lakh.) जाईल. शिवाय, त्याची रक्ततुलाही केली जाईल, अशी घोषणा आपण लगेच शिवसेनेच्या दत्त चौकातील आंदोलनात केल्याचे संतोष ढवळे (Yavatmal Shisena Leader Santosh Dhawale) यांनी सांगितले. या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. Shiv Sena district chief Parag Pingale, Rajendra Gaikwad and various office bearers had participated in the agitation.

 

News English Summary: Whoever cuts off the tongue of Raosaheb Danve, who made controversial statements about farmers, we will immediately give him a vehicle worth Rs 12 lakh Yavatmal Shivsena leader Santosh Dhawale made announcement.

News English Title: Yavatmal shivsena leader Santosh Dhavale announcement against BJP MP Raosaheb Danve News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x