13 July 2020 2:08 PM
अँप डाउनलोड

निसर्ग चक्रीवादळ: कार्यकर्त्यांना प्रशासनासोबत मदतीला उभे रहावे, पवारांच आवाहन

Sharad Pawar, Cyclone, Party Workers

मुंबई, ३ जून: ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कालपासुन संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. शिवाय मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि होणार आहे. अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा, असेही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांन सांगितले असून प्रशासनासोबत काम करण्याचं सूचवलं आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीच रहावे. सरकार व प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेत असून स्वत:ही काळजी घ्या, सुरक्षित राहा असे आवाहन नागरिकांना केलंय.

 

News English Summary: National President of the Nationalist Congress Party (NCP) Sharad Pawar has directed the NCP office bearers and activists to stand with the administration as the cyclone ‘Nature’ has posed a threat to the Konkan coast.

News English Title: NCP Sharad Pawar has directed the NCP office bearers and activists to stand with the administration as the cyclone News Latest updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(273)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x