13 July 2020 2:04 PM
अँप डाउनलोड

२००९ साली उध्दवजींनी फोन करून मला शिवसेनेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं - अवधूत वाघ

Thackeray, Avadhut Wagh

मुंबई, ३ जून: २०१९ लोकसभा संपून भाजप सरकार बहुमताने सत्तेत आले आणि मंत्रिमंडळ वाटप पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येतो होता. एका बाजूला विधानसभेत दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते युतीसाठी प्रयत्न करत असताना काही नेत्यांकडून आग लावण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. त्यानंतर भाजप सेनेमध्ये कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

शिवसेनेने वर्धापन दिनानिमित्त ‘सामना’च्या अग्रलेखातून पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात अनेक संकल्प जाहीर केले होते. त्याच अग्रलेखावरुन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. अवधूत वाघ यांनी ट्विट करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला होता आणि एकप्रकारे शिवसेनेला मुख्यमंत्री पदावरून झिडकारण्याचं राजकारण सुरु केलं होतं.

त्याच्यावेळी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ म्हणाले होते की, “कोण काय म्हणतं, कोण काय छापतं, याला काहीही महत्त्व देऊ नका. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जागा पुढील पाच वर्षांसाठी रिकामी नाही.” असे म्हणत भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला होता. मात्र आज वास्तव हेच आहे की उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ज्याची कल्पना स्वतः भाजपने देखील केली नव्हती.

आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर अवधूत वाघ यांच्या जुन्या आठवणी उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे. अवधूत वाघ यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “शिवसैनीकांनो, मी कधीच शिवसेनेचा समर्थक नव्हतो. २००९ साली स्वत: उध्दवजींनी फोन करून पक्षात यायचे निमंत्रण दिले. शिवसेनेच्या स्थापनेपासून मला शिवसेनेचे आकर्षक आहे. भुमिका बदलत गेल्या. प्रेमही थोडेफार बदलत गेले. तरीही मी शिवसेना, शिवसैनीकांचा कघीच द्वेश करत नाही. करणार नाही.

काय आहे नेमकं ट्विट;

 

News English Summary: Shiv Sainiks, I have never been a supporter of Shiv Sena. In 2009, Uddhavji himself called and invited him to join the party. I have been fascinated by Shiv Sena since its inception. Love also changed a little. However, I never hate Shiv Sena, Shiv Sainiks. Will not said BJP Leader Avadhut Wagh News latest updates.

News English Title: In 2009 Uddhav Thackeray was himself called and invited me to join the Shivsena party said  BJP Leader Avadhut Wagh News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x