26 July 2021 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार

Maratha reservation

मुंबई, ११ मे | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा रोष मराठा समाजाने ठाकरे सरकारवर काढला. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून नव्या प्रयत्न केले जात आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (११ मे) सायंकाळी ५ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. मध्यतंरी झालेल्या वादानंतर ही पहिल्यांदाच ही भेट होणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचं सांगितलं होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता थेट राष्ट्रपतींकडे हा मुद्दा मांडत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्दयावर पत्र लिहिलं आहे, ते पत्र राज्यपालाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या विधी मंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने वरवंटा फिरवला असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता पुन्हा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्यात येत आहेत. गेल्या वर्षभरानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट होत आहे.

मध्यंतरी राज्यपाल नियुक्त आमदारांवरून वाद, विमान प्रवासाचा वाद, राज्यपालांनी लिहिलेलं पत्र, कोरोना आणि कंगाना, हिंदुत्व अशा अनेक मुद्यांवरून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद पेटला होता. या वादानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये संवाद दुरावला होता. आता वर्षभरानंतर पहिल्यांदाच ही भेट होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.

 

News English Summary: The Supreme Court has canceled the Maratha reservation. The Maratha community was angry with the Thackeray government over this decision of the Supreme Court. Therefore, new efforts are being made by the Mahavikas Aghadi government in the state. On this issue, Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray will meet the Governor today (May 11) at 5 pm. This will be the first visit after a mediated dispute.

News English Title: CM Uddhav Thackeray will meet governor regarding Maratha Reservation letter to President of India news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(199)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x