2 May 2025 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

तो निर्णय चुकीचा होता, पाठीत खंजीर खुपसला गेला | सकाळच्या शपथविधीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis

मुंबई, ०४ जून | लोकसत्ता’तर्फे आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकांनंतर अजित पवार यांच्यासोबत भल्या सकाळी घेतलेला शपथविधी अजूनही चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ८० तासांच्या चाललेल्या सरकारची चर्चा अजून देखील होत असते. त्यावर फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर खुद्द भाजपामधून देखील चर्चा किंवा नाराजी किंवा पाठिंबा अशा संमिश्र भूमिका व्यक्त होत असतात. पण हे ८० दिवसांचं सरकार स्थापन करताना नेमकी आपली काय भूमिका होती, हे आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलं आहे.

भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून फाटल्यानंतर पडद्यामागून अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण पाठिंब्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हे सरकार ४ दिवसांत गडगडलं. पण तो निर्णय चुकीचाच होता, असं फडणवीस म्हणाले आहेत. राष्ट्रवादीसोबतचं सरकार करायला नको होतं. ती चूक आहे. असं सरकार आम्ही स्थापन करायला नको होतं”, असं फडणवीस म्हणाले. निवडणूक काळातील आघाडीविषयी फडणवीसांनी यावेळी सविस्तर भूमिका मांडली आहे.

दरम्यान, अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मान्य केलं. “तो निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केलं. पण ही चूक होती. आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेला. ते नसतं केलं तर चांगलं झालं असतं”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात सरकार पडलं, त्यावेळी नेमकं काय घडलं, यावर देखील फडणवीसांनी यावेळी भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी पहिली मुलाखत देऊन आमचे सर्व पर्याय खुले आहेत असं सांगितलं. तेव्हा आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणात फार उतरत नाहीत. पण अमित शहा कायम चर्चेत होते. मी इश्वरावर आणि योगावरही विश्वास ठेवतो. कधीतरी योग असा असतो की आपण खूप प्रयत्न करतो. पण फासे नीट पडले नाहीत आणि गेलं सरकार”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

 

News English Summary: After the split between BJP and Shiv Sena, Devendra Fadnavis took oath as the Chief Minister by shaking hands with Ajit Pawar behind the scenes. Besides, Ajit Pawar was sworn in as Deputy Chief Minister. But due to lack of support, this government collapsed in 4 days. But that decision was wrong, Fadnavis said.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis talked on early Moring oath ceremony with Ajit Pawar news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या