महत्वाच्या बातम्या
-
२०२४ मधील निवडणुकीत भाजपला देशात ३० कोटी मतं मिळतील | प्रदेशाध्यक्षांचं विधान
आगामी लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार असल्या तरी या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासून प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना येत्या २०२४ च्या निवडणुकीत तब्बल ३० कोटी मतं आणि ४०० पेक्षा अधिक जागा देशभरात जिंकायच्या आहेत असा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या २७ गावांच्या विकासासाठी विशेष पॅकेज द्या | आ. राजू पाटील यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. 27 गावांसाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशी आग्रहाची विनंती आमदार राजू पाटलांनी बोलून दाखवली होती. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या दिवा शिळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी, अशीही मागणी यापूर्वी राजू पाटील यांनी अजित पवारांकडे केली होती.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही ED लावली | आता माझ्याकडून सीडी लावण्याचं काम बाकी | जामनेरमध्येच इशारा
भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात येऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी डरकाळी फोडली आहे. सीडी लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो. पण खरंच माझ्या मागे ईडी लावलीत, आता सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब – गोपीचंद पडळकर
जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलं असून, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोना काळ असल्यानं त्याचं उद्घाटन हे रखडलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारचं स्पष्टीकरण | तो प्रकार राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणातून घडला
राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागले | त्यांनीच पदाचा मान ठेवला नाही
राज्यपाल गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच राज्यपालाच्या पदाचा सन्मान ठेवला नाही, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. राज्यपालांना सरकारी विमानप्रवास नाकारणे हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार
खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही भेट होणार आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला मनसेसोबत युतीची आशा? | भाजपकडून पुन्हा त्याच मुद्यावर भाष्य
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने स्वबळाची भूमिका घेतली आहे आणि त्यानुसार पक्ष विस्तार सुरु केला आहे. विशेष म्हणजे आज पर्यंत मराठी माणूस केंद्रस्थानी असणाऱ्या मनसेमध्ये इतर पक्षातील उत्तर भारतीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केल्यानंतर समाज माध्यमांवर मोठी चर्चा रंगल्याच पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता. विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम यांना सर्वात मोठा धक्का देण्यात आला. भाजपचे स्थानिक नेते सुनील यादव यांच्यासोबत आमदार राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. तसेच मुंबईतील चांदिवली विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मनसेचा झेंडा हाती घेतला.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांना खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरायची असेल तर त्यासंदर्भात काही नियम आहेत
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. आता पुन्हा एकदा राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासालाच मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब अशी की राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचं कळालं आणि त्यांना विमानातून उतरुन राजभवनात परतावं लागलं अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपाल विमानात बसले आणि नंतर खाली उतरले | राज्य सरकारसोबत वाद पुन्हा वाढणार?
ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.
4 वर्षांपूर्वी -
रोहित पवारांचा आरे जंगल दौरा | पर्यावरणप्रेमी आणि आदिवासींशी संवाद | क्रिकेट ते रिक्षातून सफारी
राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांनी आज आरेच्या जंगलात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांची संवाद साधत विषय सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालवत आमदार रोहित पवारांनी आरे कॉलनी भागात सफारी केली. त्यानंतर वृक्ष रोपण करून रोहित पवारांनी क्रिकेटचा आनंद देखील अनुभवला.
4 वर्षांपूर्वी -
गोल्ड फिंच हॉटेलमध्ये मुंबई भाजप नेते | महाविकास आघाडीसंदर्भातील राजकीय पुड्यांवर चर्चा
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशा राजकीय पुड्या सोडण्याचे प्रकार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरु आहेत. मात्र वास्तव वेगळं असल्याने भाजपातील पदाधिकाऱ्यांना पक्षातच थोपवायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र भाजपातील नेत्यांसमोर उभा आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऊर्जा विभाग भरती | SEBC उमेदवारांना EWS प्रवर्गातून भरतीची संधी | ऊर्जा विभागाचं परिपत्रक
मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रखडलेल्या ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आता EWS प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसं परिपत्रक ऊर्जा विभागानं काढलं आहे. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना वगळून ही भरती केली जाणार होती. मात्र, त्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केलाय. अखेर SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून या भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय ऊर्जा विभागानं घेतला आहे. ऊर्जा विभागातील अभियंता पदासाठी तीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग | रोड रोमिओला ६ महिने कारावासाची शिक्षा
स्त्रियांच्या होणाऱ्या विनयभंगावर न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात एक निर्णय देत एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
4 वर्षांपूर्वी -
MHADA Lottery 20-21 | म्हाडाच्या घरांची लॉटरी | विजेत्यांची नावं उद्या जाहीर होणार
म्हाडाची मुंबईची लॉटरी उद्या गुरुवारी 10 फेब्रुवारीला दुपारी जाहीर होणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाश्यांसाठी ही लॉटरी सोडत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील 300 घरांची लॉटरी निघणार आहे. दुपारी 12.30 वाजता ही लॉटरी निघेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
विधानपरिषदेच्या १२ जागा | राज्यपाल कोर्टात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधानपरिषेदच्या 12 जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हटलंय. ते नाशिक येथे बोलत होते. बहुमत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष पाळत योग्य त्या नावांची शिफारस केली आहे. राज्यपालांना रीतसर सगळं कळवलेलं आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यांनी यावेळी कोरोना महामारीमुळं राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, शेतकरी आंदोलन, नाशिक नियो मेट्रोयाविषयांवर भाष्य केलं. त्याशिवाय महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असंही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
विदेशी चलन प्रकरण | बिल्डर अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ची धाड
बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने छापेमारी केली आहे. ED चे अधिकारी सकाळी 8:30 पासून ABIL हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. फेमासंबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हे 6 वर्षांपूर्वीचे विदेशी चलन प्रकरण आहे.
4 वर्षांपूर्वी -
....ते आमची सत्ता असताना आम्ही केलं असतं तर शिवसेना संपली असती, हे खरं आहे - चंद्र्कांत पाटील
अमितभाईंच्या पायगुणाने वैभववाडीतील 6 नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही” असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची पिंपरी चिंचवडमध्ये सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत जाहीर प्रवेश | राम कदमांचे शेकडो कार्यकर्तेही मनसेत
कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या गळतीनंतर आता पुन्हा चित्र पालटू लागलं आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम यांना सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. भाजपचे स्थानिक नेते सुनील यादव यांच्यासोबत आमदार राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेतजाहीर प्रवेश केला. तसेच मुंबईतील चांदिवली विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मनसेचा झेंडा हाती घेतला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH