महत्वाच्या बातम्या
-
भाजपाची जन आशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट करायला आहे का? - नाना पटोले
भाजपाची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भाजपाने लोकांना फसवले. आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढता, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील बार, मॉल सुरू मग मंदिरे का बंद ? । देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
राज्य सरकारकडून मंदिरे का बंद ठेवली जातात, हा प्रश्न आहे. राज्यातील बारमध्ये तसेच मॉलमध्ये जितकी गर्दी होते. त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सुरक्षित अंतर ठेवून मंदिर खुले होऊ शकतात, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
आक्रमक?। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं 'कुरिअर' करणार। थेट जाऊन देणार नाहीत
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, ४ दिवस दिल्लीत थांबूनही शहांनी भेट नाकारली । पवार साहेबांवर काय बोलावं
राज्यपाल यांचं वय झालं आणि शरद पवार साहेब यांचं वय झालं नाही का?, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर पलटवार करताना केला होता. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांतदादा, तुमचं जेवढं वय आहे तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे, असा जोरदार टोलाराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला [प्रदेशाध्य्क्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीच्या आरोपांनंतर गजानन काळे फरार | नवी मुंबई पोलिस पथकांकडून शोध सुरु
नवी मुंबई सारख्या महत्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. कारण घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पर्यावरण व हवामान बदल विभागात (मुंबई) 20 जागांसाठी भरती | ऑनलाइन अर्ज
पर्यावरण आणि हवामान बदल विभाग भरती 2021. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे आणि 20 इंटर्नशिप प्रोग्राम पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार ईसीसीडी भरती 2021 साठी 31 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या महागाई, इंधनदर, घसरलेला GDP संदर्भातील आश्वासनांवर जन आशीर्वाद यात्रेतून उत्तर द्यावीत - भास्कर जाधव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी गडकरी यांना टोला लगावत काही सवाल उपस्थित केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींना आरक्षण मिळावे असे सरकारच्याच मनात नाही - देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण हे केंद्र सरकारमुळे गेले आहे असे म्हटले होते. यावर पुणे विमानतळावर आज (मंगळवार) विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते यावेळी म्हणाले की, संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण सुरू आहे. फक्त महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षण गेलेलं आहे. इतर कुठल्याही राज्यात ते गेलेलं नाही. हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही. जोपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत राज्य सरकारला ओबीसींच्या आरक्षणामध्ये चालढकल करायची आहे, तोपर्यंत कारणं सांगायची आहेत, अशी टीका फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमर-अकबर-अँथनी अशी यांची ३ दिशेला तोंडं | हे सरकार आपापसांतच भांडून पडेल - रावसाहेब दानवे
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे योनीपुन्हा एकदा राज्यसरकारवार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात भाजपासोबत काडीमोड घेऊन शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन पक्षांचं सरकार स्थापन केलं. मात्र, सुरुवातीपासूनच राज्यात भाजपाकडून सरकार कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. तसेच, आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, सरकार आपोआपच पडेल, असं देखील भाजपाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, पुन्हा एकदा राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल, अशी ‘भविष्यवाणी’ रावसाहेब दानवे यांनी वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत? | तुम्ही तर दळीद्री विचाराचे - रुपाली पाटील
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रविण गायकवाड, श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. त्यावर मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाड यांना पुण्यात फिरू देणार नाही असा थेट धमकीवजा इशारा दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | कोर्टाने आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिन्यांच्या कारावास ठोठावला
वरुड येथील तत्कालीन तहसीलदाराला अर्वाच्च शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासासह 45 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षेचा समावेशही करण्यात आला आहे. देवेंद्र भुयार सध्या मोर्शी-वरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमधील पक्षांतर्गत विरोधकांना जे हवं होतं, तेच पंकजांकडून घडलं? | तर त्या भविष्यात....
मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना पक्षांतर्गत अघोषित विरोधाचा सामना करावा लागतोय हे लपून राहिलेलं नाही. त्यांनी अनेकदा तसा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिल्या होत्या. अगदी शिवसेना सारख्या पक्षाने तर त्यांना खुली ऑफर देत शिवसेनेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. अगदी केंद्रीय मंत्री पदी खासदार बहिणीची वर्णी न लागत मराठवाड्यातील दुसरे ओबीसी नेते भागवत कराड यांना संधी दिली हा देखील त्यांना धक्का होता हे देखील सत्य असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
4 वर्षांपूर्वी -
७ पिढ्या लांब राहिल्या, 2024 नंतर विनायक राऊतांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही - निलेश राणे
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही,” असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. त्यानंतर आता निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. “सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही,” असा पलटवार निलेश राणे यांनी केलाय. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
तेव्हा त्यांच्या कुटुंबात असा कुठलाही वाद दिसला नाही | पण पोलीस आपली कारवाई करतील - शर्मिला ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तसेच थेट पत्नीने आरोप केल्याने मनसेची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यात गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर विविध पक्षातील महिला जमा झाल्या आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र ४ दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीएचआर घोटाळा | फरार भाजप आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर
ज्यातील बहुचर्चित बीएचआर अपहार प्रकरणी जळगाव विधान परिषदेचे आ.चंदूलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयाने मंजूर केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी अनेक दिग्गज गोत्यात अडकले आहेत. याच प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर देखील ठेवी मॅनेज केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंना कोणत्याही क्षणी अटक होणार | काय घडामोडी घडल्या?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तसेच थेट पत्नीने आरोप केल्याने मनसेची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यात गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर विविध पक्षातील महिला जमा झाल्या आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र ४ दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्यासाठी पवारांनी या 'तीन' महत्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या
नरेंद्र मोदी सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार दिले. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी ओबीसी आरक्षणावरून पवारांनी भाजपला जोरदार झापतानाच ओबीसींना आरक्षण कसे मिळेल याबाबत मत व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकारचं पत्र गेलंय, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल - शरद पवार
राज्यपालांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सदस्यांनी भेटून १२ आमदारांची यादी दिली आहे. त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात याबाबत अनेकदा विनंती केली आहे. मात्र सरकार आग्रही नाही असे म्हणणे आश्चर्याचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या दीर्घकाळ रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ करा, अशी विनंती काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांकडे केली.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांच्या सर्व मागण्या फेटाळल्या | CRPC'च्या अनुषंगाने याचिका करण्याची सूचना
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला नाही. अनिल देशमुख यांच्या मागण्या कोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता अनिल देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं | त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे - शरद पवार
महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे म्हणले होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN