महत्वाच्या बातम्या
-
तुम्ही उभ्या देशात नियम फाट्यावर मारता, ते धंदे आम्हाला इथे शिकवू नका | शेलारांना झापलं
भाजप आमदार आशिष शेलार कायम शिवसेनेवर कायम निशाणा ठेऊन असतात. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या मराठी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून वादाची ठिणगी पडली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून शिवसेनेवर बाण डागल्यानंतर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शेलारांना नागरिकशास्त्र वाचण्याचा सल्ला देत टोला लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
उर्मिला मातोंडकरांवर कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप | जिल्हा प्रशासनाचे चौकशीचे आदेश
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्या उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील आहे.
3 वर्षांपूर्वी -
संजय राठोड अडचणीत | घाटंजीत एसआयटीचे पथक दाखल | तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवणार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदारांकडे नियमबाह्य मागण्या | गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामं बंद पडतील, असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार खासदारांकडून विरोध होत असल्याचं गडकरी यांनी पत्रात म्हटलंय.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात डेल्टा प्लसमुळे 5 जणांनी जीव गमावला | लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात एंट्री
कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रात अनलॉक 3.0 सुरू होत आहे. व्हायरसच्या ‘डेल्टा प्लस’ प्रकारामुळे आतापर्यंत राज्यात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एक मुंबईचा, 2 रत्नागिरीचे, एक बीडचा आणि एक रायगडचा आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांचे वय सुमारे 65 वर्षे आहे. यापैकी 2 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर दोघांनी प्रत्येकी एक डोस घेतला होता. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटची एकूण 66 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेची अनधिकृत नळधारकांसाठी अभय योजना | कसा आणि कुठे कराल अर्ज?
पुणेकरांसाठी महापालिकेनं महापालिका हद्दीतल्या अनधिकृत नळधारकांसाठी एक महत्वाची अशी अभय योजना आणली आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी नियमित करता येणं शक्य आहे. मात्र, यासाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळा | अडचणीत वाढताच गिरीश महाजन म्हणाले, सुनील झंवर सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय
बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी मुख्य संशयीत सुनील झंवर यांना अटक झाली आहे. सुनील झंवर यांना अटक झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. सुनील झंवर हे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय असल्याचा पुनरोच्चार माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात १२ आमदारांबाबत जी राजकीय बंदी घातली आहे, ती हटवली पाहिजे - संजय राऊत
राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी उच्च न्यायालयाने याविषयी सुनावणी केली आहे. जास्त काळ राज्यपाल या जागा रिक्त ठेवू शकत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या भेटीत 12 आमदारांच्या नियुक्तीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
12 आमदारांच्या नियुक्तीवरुन हायकोर्टाने कान टोचले | राज्यपालांनी लगेच घेतली अमित शहांची भेट
राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी उच्च न्यायालयाने याविषयी सुनावणी केली आहे. जास्त काळ राज्यपाल या जागा रिक्त ठेवू शकत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या भेटीत 12 आमदारांच्या नियुक्तीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | हुरड्याची झणझणीत उसळ - खास रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया हुरड्याची उसळ बनवण्यासाठी खास रेसिपी…
3 वर्षांपूर्वी -
भाजप-महाविकास आघाडीच्या राजकारणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही | आता आरपारची लढाई
राज्यातील मागील भाजपा व विद्यमान महविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. दोघांच्या राजकारणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यापुढे आरपार की लढाई असेल. मराठा समाज मूक मोर्चा काढणार नाही तर, हातात दंडूके घेवून ठोक मोर्चा काढेल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
आजच्या घडीला दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना अधिक - देवेंद्र फडणवीस
दिल्लीत लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. काँग्रेसने याघटनेच्या विरोधात दिल्लीत जोरदार आंदोलन केलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देखील त्या आंदोलनात उपस्थित होते. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून, दिल्लीत डोकं वर काढून आंदोलन करायचं मात्र महाराष्ट्रात तोंड लपवत फिरायचं, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांसह अन्य शिवसेनेच्या नेत्यांनाही रिफायनरी प्रकल्प हवा आहे - प्रमोद जठार
शिवसेनेची अनेक नेते मंडळी तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार राजन साळवी यांना रिफायनरी प्रकल्प हवा आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीदेखील या प्रकल्पाच्या बाजूने आहे. त्यामुळे हा प्रकल्प राजापूरमध्येच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे वक्तव्य भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु | 'या' ५ मनपा क्षेत्रातील प्रवेश ऑनलाईन पद्धतीने
राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.
3 वर्षांपूर्वी -
MPSC आयोगाकडून अभियांत्रिकी विद्युत सेवा आणि वनसेवेच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर
उद्धव ठाकरे सरकारच्या आदेशानंतर एमपीएससी आयोग अॅक्शन मोडवर पाहायला मिळत आहे. एमपीएससी आयोगाने महाराष्ट्र अभियांत्रिकी विद्युत सेवा आणि महाराष्ट्र वनसेवेच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
औरंगाबादेत युवासेनेच्या कार्यक्रमात तरुणांची तुफान गर्दी | कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर
औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी आज (13 ऑगस्ट) तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी बीडलादेखील अशाच प्रकारे गर्दी झाली होती. कार्यक्रमात गर्दी झाली तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असे सरदेसाई यांनीच यापूर्वी म्हटलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
अविनाश जाधव म्हणालेले 'मी तोंड उघडलं तर हा तोंड लपवत फिरला असता' | आज पत्नीच्या एका आरोपात साम्य?
सध्या मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांचावर त्यांच्या पत्नीने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यात एक आरोप हा नवी मुंबई मनपातील वसुलीवरून देखील आहे. मात्र आता त्या आरोपांना अनुसरून साधारण दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई आणि ठाणे मनसेतील अंतर्गत वादातून घडलेली घटना समोर येतं आहे. मनसेतील तो अंतर्गत वाद त्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या आणि राज ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतर निवळला होता, परंतु काही फूटप्रिंट अविनाश जाधव यांच्या वक्तव्यातून राहून गेल्याच म्हणता येईल.
3 वर्षांपूर्वी -
भागवत कराडांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडापासून | तर लातूर ओबीसी महामेळाव्याचे अध्यक्ष दुसरे कराड?
कायद्यानं मिळालेलं आरक्षण राज्य सरकारच्या दूर्लक्षामुळे रद्द झालं याबाबत ओबीसी इतर मागासवर्गीयात जनजागृती करण्यासाठी आणि हक्काचे आरक्षण परत मिळवून घेण्यासाठी उद्या (१४ ऑगस्ट) रोजी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी भटक्या विमुक्त जातीचा महाजागर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यपाल 6 वर्षात कधीही या यादीवर निर्णय घेऊ शकतात | 6 वर्षात नेमका कधी ते राज्यपाल ठरवतील - दरेकर
विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतचा वाद कोर्टाने निकाली काढला आहे. “या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं.
3 वर्षांपूर्वी -
भाजपसोबत युती करावी | अन्यथा 2024 मध्ये शिवसेनेचं मोठं नुकसान होणार - आठवलेंचा इशारा
भारतीय जनता पक्ष एकाबाजूला राज्यातील २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. त्यासाठी राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रा काढण्याचं नियोजन आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली