महत्वाच्या बातम्या
-
शेतकरी बांधवांनो | राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2021-22 | ऑनलाईन अर्ज कसा करायचा? - नक्की वाचा
शेतकरी मित्रांनो , या लेखात आपण राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे . अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे .
4 वर्षांपूर्वी -
सरकारी योजना | राष्ट्रीय बायोगॅस योजना 2021 | असा अर्ज करा आणि १२ हजार मिळावा
राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेसंदर्भात अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेची सुरुवात देशामध्ये सन 1982-83 पासून झालेली असून ही योजना केंद्र शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र स्वतःकडे घेण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल? - सविस्तर वृत्त
राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईचे फास आवळले जात असताना, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील ईडीची ‘फाइल’ तयार होत आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट देणारे तत्कालीन पोलिस महासंचालक परमबीरसिंग हे वाझे-देशमुख प्रकरणानंतर भाजपसोबत गेल्याने, महाविकास आघाडी सरकारविरोधातील घडामोडींना आणखी वेग आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधान परिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्रात अनेक मुद्द्यांपैकी एक महत्वाचा विषय म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा. गेले अनेक महिने नावांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे देऊनही त्यावर शिक्कामोर्तब झाला नाही. यावरुन आता सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप केला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने यासंदर्भातील याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. राज्यपालांना सल्ला देणे हे आमचे काम नाही, असे कोर्टाने याचिकादाराला सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख दिल्लीला रवाना | ईडीच्या नोटिशीविषयी कायदेशीर सल्ला घेण्याची शक्यता
आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या तपशिलासह सहा मुद्द्यांवर सविस्तर तपशील मागितला आहे. त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांनिशी पुढील चौकशीवेळी हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचं दत्तक नाशिक | स्मार्ट सिटीच्या विकासाला नाशिककर कंटाळले | स्थानिकांची बॅनरबाजी
आपलं शहर स्मार्ट असावं, अशी प्रत्येक शहवासीयांची अपेक्षा असते. परंतु चुकीच्या आणि रेंगाळलेल्या कामांमुळे वैताग आल्यावर हे काम थांबवण्याची मागणी नागरिकांना करावी लागते. काहीशी अशीच परिस्थिती नाशिकमधील मुख्य रस्त्यांची झाली आहे. दहीपूल बाजारपेठेतील रस्ते खोदून त्याची उंची काम केली आहे. यामुळे पावसाचे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि रहिवाश्यांच्या घरात घुसण्याची शक्यता आहे. यामुळे स्थनिक नागरिकांनी काम थांबवण्याची मागणी करणारा फलकच लावला आहे. मुख्य रस्त्यावर असलेला पिंपळपार चौकात स्मार्ट सिटीचे काम संथगतीने सुरु आहे. यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. हे काम त्वरित थांबवण्याची विनंती नागरिकांनी केली आहे. त्यासाठी फलकाचा आधार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेती | वारस नोंद कशी करायची? | वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? - वाचा ऑनलाईन स्टेप्स
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा, सरकारची ई-हक्क प्रणाली काय आहे, याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र HSC निकाल | फॉर्म्युला ठरला, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्यावरून केंद्राला जानेवारीत अल्टिमेटम देणारे अण्णा महाविकास आघाडी विरोधात संधी मिळताच जुलै'मध्ये प्रकटले
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारी महिन्यात पत्र लिहून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण जानेवारी महिन्याच्या अखेरीस आंदोलन करणार आहोत. हे आपले अखेरचे आंदोलन असेल असे अण्णा हजारे यांनी म्हटले होते. आपणास आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही तरीही आपण आंदोलनास बसणार असल्याचे अण्णांनी पंतप्रधानांना दिलिहेल्या पत्रात म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतरही मेटें'कडून फडणवीसांचा जयजयकार | म्हणाले फडणवीसांना विनंती करा आणि दिल्लीला...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 102व्या घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. राज्य सरकारने विधीमंडळात एक ठराव करावा. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना घटनादुरुस्ती करण्याची विनंती करावी, असं सांगतानाच केंद्र सरकार जर ऐकत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सोबत न्यावं, असं आवाहन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज केलं.
4 वर्षांपूर्वी -
दिव्यांगांना, अपंगांना 2000 रुपये सरकारी मदत, अर्ज सुरू | असा भरा ऑनलाईन फॉर्म
समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका जाहिर प्रकटन सन 2021-2022 कोविड-१९ प्रादुर्भावाच्या काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये आर.टी.जी.एस. द्वारे प्रत्येकी रक्कम रू.2000 प्रमाणे एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना दिलासा | पिक कर्ज वसुलीस दिली 31 जुलैपर्यंत मुदत वाढ
शेतकऱ्यांनी मागील वर्षी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक यांच्याकडून घेतलेल्या पीककर्ज परतफेडीसाठी शासनाने शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात दिलेल्या मुदतवाढीच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 जुलै पर्यंत दर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेत केली तर शेतकऱ्यांना व्याजात सवलत मिळेल, अशी माहिती राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच व्यापारी बँकांमार्फत पीक कर्जाचा पुरवठा केला जातो.
4 वर्षांपूर्वी -
पशुसंवर्धन योजना अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य उपक्रम | एक कॉल करा, घरपोच पशुवैद्यकीय सेवा
पशु संवर्धन योजना संदर्भात जाणून घेवूयात. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अंतर्गत फिरता पशु वैदकीय दवाखाना संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी पशु संवर्धन विभागाच्या विविध योजना सुरु असतात. त्या योजनांची आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात किंवा दुग्धव्यवसाय करतात त्यांना या योजनेचा खूप लाभ होऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी बांधवांकडे गाई, म्हशी आणि शेळ्या असतात त्याचप्रमाणे शेती कामासाठी गुरे देखील असतात. जनावरे आजारी पडली कि मग शेतकऱ्यांची खूप परवड होते त्यामुळे हा उपक्रम जाणून घेणे खूप महत्वाचे ठरणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारने ईडीचा कितीही वापर केला तरी महाविकास आघाडीला धोका नाही - खा. विनायक राऊत
मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली. केंद्र सरकारचं हे पाऊल चुकीचं होतं, असं सांगतानाच आता केंद्र सरकारने आता आपलं अपयश झाकण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ नेत्यावर पातळी सोडून टीका आणि वक्तव्यात महिलांचाही अनादर | कृपया लक्ष घाला - रोहित पवारांची तक्रार
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती. याचे पडसाद संपूण महाराष्ट्रात आगी सरखे पसरत आहेत. त्यांच्या टीकेनंतर बुधवारी संध्याकाळी त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यावरून पडळकर यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री - अजित पवार
साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | कुक्कुटपालन पालन योजना सुरु झाली | असा करा अर्ज | शासनाच्या वतीने आवाहन
कुक्कुटपालन पालन योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेती करत असतांना शेतकरी बांधवाना शेतीमध्ये नैसर्गिक संकटाचे अनेक धोके पत्करावे लागतात. शेती व्यवसायामध्ये केवळ शेतीवर अवलंबून राहिल्यास अधिक तोटा होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतीला काहीतरी जोड धंदा असणे आवश्यक आहे. शेतकरी बंधुंनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पूरक व्यवसाय करू इच्छित असाल तर शासकीय अनुदानावर आधारित कुक्कुटपालन पालन योजनेचा लाभ घ्या.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस शिपाई आता निवृत्तीच्या वेळी PSI होणार | गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील पोलिस शिपाई आणि कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने सुखद घोषणा करण्यात आली आहे. आता राज्यभरातील पोलिस शिपाई आपल्या निवृत्तीपर्यंत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंत मजल मारतील. पोलिस दलात शिपाई या पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाची आता पोलिस उप-निरीक्षक पदावर निवृत्ती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात यासंदर्भातील घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, महागाईविरोधात राष्ट्रवादीचं राज्यव्यापी आंदोलन | ममतांनीही तेच केलं होतं
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील सामान्य जनता महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रस्त आहे. विशेष म्हणजे मोदी सरकार यावर कोणत्याही उपाययोजना देखील करताना दिसत नसल्याने सामान्यांचं जगणं कठीण होऊ बसलं आहे. कारण आता सरकारी इंधन कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत स्वयंपाकाच्या गॅसच्या एका सिलिंडरसाठी ८३४.५० रुपयांना मिळेल.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-शहा, फडणवीस भेटीचा राज्य सरकार पाडण्याशी संबंध नाही | आम्ही 2024'च्या तयारीला लागलोय - रावसाहेब दानवे
देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL