21 November 2019 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

जिंकलो असलो तरी घरातील माणसाचा पराभव झाल्याने मनात खंत: धनंजय मुंडे

Parli Vidhansabha, NCP Dhananjay Munde, Pankaja Munde, Maharashtra Vidhansabha Election 2019

परळी: परळीत पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान, मी पराभव स्वीकारत असून आपल्या वडिलांनी पराभव कसा खांद्यावर घ्यायचा हे शिकवलं असल्याचं त्या म्हणाल्या.

भाऊ बहीण आमनेसामने आल्यानं बीडमधल्या परळीत काय घडणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी जवळपास 20 हजार मतांनी विजय मिळवला. मतदान झाल्यानंतरही बीडमधल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या होत्या. मुंडे बंधू भगिनींनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ही लढत राज्यासाठी लक्षवेधी ठरली. पंकजा मुंडे मंत्री होत्या. त्यामुळे त्यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. खुद्द पंकजा यांनीदेखील निकालानंतर तशीच भावना बोलून दाखवली.

हाती आलेल्या निकालानुसार, धनंजय मुंडे यांनी २१ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळं परळीत यावेळी वेगळा निकाल लागणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांनी धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘जिंकलो असलो तरी घरातील माणसाचा पराभव झाल्याने मनात खंत’ अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(23)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या