बारामती: महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांसह एकूण ७० नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. ईडीने केलेल्या कारवाईविरोधात बारामतीकरांनी बारामती बंदची हाक दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा कोणत्याही संघटनेने बारामती बंदची हाक दिलेली नसून सामन्य नागरिकांनी हा बंद पुकारला आहे, अशी प्रतिक्रिया बारामतीकरांना दिली आहे. बारामती बंदला उत्स्फुर्त मिळत आहे. बारामतीतील बाजारपेठा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून शाळेत आलेले विद्यार्थीही शाळा बंद असल्याने परत घरी निघाले आहेत.
राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश झाल्याचे समजते. याच विषयावर मंडईतील टिळक पुतळ्याजवळ राष्ट्रवादीने आंदोलन केले. या आंदोलनात ‘नरेंद्र-देवेंद्र चोर है’ अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र त्यानंतर अचानक कार्यकर्त्यांनी जवळ असणाऱ्या महात्मा फुले मंडई पोलीस चौकीवर चढून घोषणा दिल्या.
राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल नाबार्डने दिल्यावर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यात शरद पवार यांचाही समावेश झाल्याचे समजते. याच विषयावर मंडईतील टिळक पुतळ्याजवळ राष्ट्रवादीने आंदोलन केले. त्यानंतर अचानक कार्यकर्त्यांनी जवळ असणाऱ्या महात्मा फुले मंडई पोलीस चौकीवर चढून घोषणा दिल्या.
