फडणवीस लग्नासाठी उतावीळ, पण नवरीच मिळेना - प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद, ३१ जुलै : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये केली. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न राज्यात सुरु आहे का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत, पण त्यांना नवरीच मिळत नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘लॉकडाऊन मान्य करू नका. राज्यातील सर्व दुकाने 1 तारखेपासून उघडा,’ असं आवाहन त्यांनी दुकानदारांना केलं आहे. त्याचवेळी ‘पाहिजे तर मला अटक करा. माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी घाबरत नाही,’ असं म्हणत राज्य सरकारलाही आव्हान दिलं आहे.
‘देशात आपल्या लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोक कोरोनामुळे बाधित होऊ शकतात आणि केंद्र आणि राज्य सरकार 95 टक्के लोकांवर अन्याय करीत आहेत. येत्या 1 तारखेपासून सर्वांनी आपापली सर्व दुकाने उघडून व्यवहार करावेत. बकरी ईद मुस्लीम बांधवांनी मोकळेपणाने साजरी करावी आणि रक्षाबंधनही व्यवस्थित मोकळेपणाने साजरे करावं,’ असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केलं आहे.
जे हाल परराज्यातील कामगारांचे झाले तेच हाल लहान लहान उद्योजकांचे होत आहेत. लोकांची उपासमारीची परिस्थिती आली आहे. ८० कोटी कुटुंबांना अन्नधान देऊ म्हणले होते मात्र ते वाटलेलं काही दिसत नसल्याचं ते म्हणाले. कोरोना संदर्भात सत्य स्थिती मांडायला राज्य किंवा केंद्र शासनाकडे राजकीय हिम्मत आणि नेतृत्व नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.
भूकबळी आणि इतर आजारामुळे लोक मरत आहेत. हे लॉकडाऊन चक्रामध्ये दोन्ही शासन स्वतःहून अडकलेत. बाहेर पडण्याचा रास्ता त्यांना दिसत नाही. सर्वसामान्य जनतेनेच शासनाला रास्ता दाखवण्याची गरज आहे. 3 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने सार्वजनिक वाहतूक सुरू करा असं आवाहन त्यांनी शासनाला केलंय.
News English Summary: Former Chief Minister Devendra Fadnavis is in a hurry for marriage. However, Prakash Ambedkar, president of the Vanchit Bahujan aghadi, sharply criticized him in Aurangabad for not getting a bride.
News English Title: Prakash Ambedkar Slams Devendra Fadnavis About Operation Lotus News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल