12 December 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नगरसेवकाचं निधन

Pimpari Chinchwad, NCP Corporator Javed Shaikh, passed away

पिंपरी चिंचवड, ३१ जुलै : पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आणखी एका नगरसेवकाचं आज निधन झालं आहे. जावेद शेख असं आज निधन झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. शेख हे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही परिचित होते.

जावेद शेख यांना १६ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर केलेल्या चाचणीनुसार त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला होता. मात्र त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. शिवाय ते किडनीच्या आजारानेही त्रस्त होते. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र आज संध्याकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तत्पूर्वी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे कोरोनामुळे निधन झालं होतं. मुकुंद केणी हे ठाण्यातील गरजू लोकांना मदत करत होते. याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली. २७ मे रोजी ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 9 जून रोजी रात्री त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे उपचारादरम्यान पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली होती.

 

News English Summary: Another NCP corporator from Pimpri Chinchwad Municipal Corporation has passed away today. The name of the corporator who passed away today is Javed Sheikh. Sheikh was also known to be close to NCP leader and Deputy Chief Minister Ajit Pawar.

News English Title: Pimpari Chinchwad NCP Corporator Javed Shaikh passed away News Latest Updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x