3 May 2025 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

आरोपातील तारीख चुकली | देशमुख त्या तारखेला मुंबईत नव्हे तर नागपूरला होते

Sharad Pawar, Anil Deshmukh, Sachin Vaze, Parambir Singh

मुंबई, २२ मार्च: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. आता यावर शरद पवारांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी यावेळी अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रंच पत्रकार परिषदेत सादर केली. “अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय”, असं शरद पवार म्हणाले.

आरोपात तथ्य नाही, राजीनाम्याचा प्रश्नच नाही:
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, ‘परमबीर सिंह यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत अनिल देशमुख रुग्णालयामध्ये होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता तथ्य राहिलेले नाही, अनिल देशमुख या काळात मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना परमबीर सिंह यांनी ‘व्हॉट्सअॅप चॅट’चा मजकूर जाहीर केला होता. तसंच, कोणते पोलीस अधिकारी देशमुख यांना कोणत्या दिवशी भेटले याची माहिती देखील दिली होती. सचिन वाझे, संजय पाटील हे अधिकारी गृहमंत्र्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची जी तारीख त्यांनी नमूद केली आहे, ती संशय निर्माण करणारी असल्याचं मेडिकल रेकॉर्डवरून समोर आलं आहे.

परमबीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख यांनी वाझेंना मुंबईतील ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यात भेटायला बोलावलं होतं. मात्र, ज्या दिवशी वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याचा दावा परमबीर यांनी केला आहे. त्या दिवशी अनिल देशमुख हे मुंबईत नव्हते. ते नागपूरमध्ये होते आणि तिथं कोरोनावर उपचार घेत होते. रुग्णालयाच्या कागदपत्रांतून ते समोर आलं आहे. ‘सीएनएन न्यूज १८’ या इंग्रजी वृत्तवाहिनीनं याच कागदपत्रांच्या आधारे तसा दावा केला आहे.

 

News English Summary: The atmosphere in the state has heated up after the letter bomb of former Mumbai Police Commissioner Parambir Singh. Parambir Singh made a sensational claim against Home Minister Anil Deshmukh that he had given Sachin Waze a target of Rs 100 crore per month. After this, the demand for resignation of the Home Minister had intensified from the BJP. Now Sharad Pawar has given important information on this. Sharad Pawar has clarified that there is no fact in the allegations, so there is no question of resignation.

News English Title: Sharad Pawar denied allegations made on Anil Deshmukh news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या