3 May 2025 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

गणेश नाईकांना नवी मुंबईचे शिल्पकार नव्हे तर मिस्टर पाचटक्के म्हटले पाहिजे - विजय नाहटा

Shivsena leader Vijay Nahata, BJP leader Ganesh Naik, Mahavikas Aghadi, Navi Mumbai

मुंबई, १७ जानेवारी: भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील साम्राज्याला हादरा देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत गणेश नाईक यांना हादरा दिल्यास त्यांचं राजकीय भविष्य देखील टांगणीला लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. परिणामी महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

मागील 20 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत वर्चस्व आहे आणि तेच मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.

दरम्यान, वाशीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने काँग्रेस नेते अस्लम शेख, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, आनंद परांजपे, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार राजन विचारे आदी नेते या मेळाव्यात उपस्थित आहेत. या निमित्ताने विजय नाहटा यांची पर्यावरण प्राधिकरणाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने अस्लम शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर महाविकास आघाडीचा नवी मुंबईतील हा पहिलाच मेळावा आहे.

यावेळी शिवसेना पदाधिकारी विजय नाहटा यांनी गणेश नाईक यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. गणेश नाईक हे भारतीय जनता पक्षामधून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना गद्दार म्हणतात. सायकलवरून फिरणाऱ्या गणेश नाईक यांना ठाकरे आणि पवारांनी मोठे केले. परंतु, नाईकांनी त्यांची साथ सोडली. त्यामुळे खरे गद्दार तुम्ही आहात, अशी जळजळीत टीका शिवसेना नेते विजय नाहटा यांनी केली.

स्वत:ला नवी मुंबईचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्यांचा शहराच्या विकासात कुठलाही सहभाग नाही. शिल्पकार घराण्याच्या बाहेर कोणालाही पद देत नाहीत. फक्त कंत्राटातून आपल्या कमिशनचे पाच टक्के घेतात. त्यामुळे गणेश नाईक यांना शिल्पकार नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’ म्हटले पाहिजे, असे टीकास्त्र विजय नाहटा यांनी सोडले.

 

News English Summary: Shiv Sena office bearer Vijay Nahta criticised Ganesh Naik in harsh words. Ganesh Naik calls the corporators who joined Shiv Sena from Bharatiya Janata Party as traitors. Ganesh Naik, who was riding a bicycle, was raised by Thackeray and Pawar. But, Naik left him. Therefore, you are a real traitor, said Shiv Sena leader Vijay Nahta.

News English Title: Shivsena leader Vijay Nahata criticised BJP leader Ganesh Naik during Mahavikas Aghadi meeting at Navi Mumbai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या