1 May 2025 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

भाजपाचे सरकार असलेल्या कर्नाटकात ST कर्मचाऱ्यांचा याच मागणीसाठी संप सुरु, काय झालं? | भाजप तुमची माथी भडकवितायेत - अरविंद सावंत

Shivsena MP Arvind Sawant write emotional letter

मुंबई, 14 नोव्हेंबर | एसटीचे विलीनीकरण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून सुरू झालेला संप अजूनही सुरूच आहे. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, परिवहन मंत्री आणि प्रशासन यांच्या सोबत दोन वेळा चर्चा झाली. मात्र, एसटीच्या विलीनीकरता अजून तरी तोडगा निघालेला नाही. सरकारने कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये, ही हात जोडून विनंती आहे. लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा, अशी मागणी (Shivsena MP Arvind Sawant write emotional letter To ST workers) त्यांनी केली.

Shivsena MP Arvind Sawant write emotional letter To ST workers. The strike, which began with the merger of STs and salaries of ST workers, is still going on :

आज मंत्रालयावर सुद्धा अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अनेक कर्मचारी हे त्रस्त झाले आहेत. ते टोकाचं पाऊल उचलत आहेत. माझे सरकारला आवाहन आहे की या संपाचा मधला काहीतरी तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, आता शिवसेनेचे खासदार आणि एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कामावर परतण्याचं भावनिक आवाहन केलं आहे. विविध मुद्दे मांडत अरविंद सावंत यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे.

अरविंद सावंत यांनी लिहिलेलं पत्र;

प्रिय एसटीतील सुज्ञ कर्मचारी, कामगार बांधवानो, भगिनींनो

जय महाराष्ट्र !!

दिवाळीपासून आपण सर्वजण हळूहळू संपात सामील झालात आणि आपल्याच प्रवाशांना ऐन दिवाळीत आपण जे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीद मिरवतो त्या सेवेपासून निव्वळ वंचित नव्हे, तर वेठीस धरण्याचं काम केलं.

बांधवानो, भगिनींनो, होय हे कबूल आहे की एसटीतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांचं वेतन कमी आहे. पण, हे माहीत असतानाही आपण नोकरी स्वीकारली. त्यातही आताच कुठे कोरोनाच्या बंधनातून आपण थोडेसं मोकळं होऊन आपली सेवा सुरु झाली. थोडासा महसूल येऊ लागला आणि आपण हा संप केला. अंतर्मुख व्हा, शेजारील कर्नाटकमधे भाजपाचे सरकार आहे. तेथेही एसटी कर्मचाऱ्यांनी याच मागणीसाठी १५ दिवस संप केला. त्याचं काय झालं याची माहिती घ्या, ही विनंती.

तीच भाजपाची मंडळी इथे आपली माथी भडकवितायेत आणि आपण त्यांच्या राजकारणाला बळी पडतोय. कोरोनाच्या संकटात आमच्या काही एसटी कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं, त्यांचा आम्हाला अभिमानच आहे. परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिला गेला याचीही आपल्याला जाण असायला हवी. एव्हढंच नव्हे तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक अर्थसहाय्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडून मिळवलं म्हणून पुढील पगार मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसं आपलं घर तुटपुंज्या पगारावर चालवणं कठीण वाटतं तसेच सरकारचंही आहे. तुटपुंज्या उत्पन्नावर एका मागोमाग एक अशी संकटाची मालिका सुरु असतानाही सरकार आपणास मदत करीत आहे. आपल्या प्राथमिक मागणीनुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून दिला; वर बोनसही दिला आणि ही सर्व रक्कम दिवाळी पूर्वीच्या पगारात दिली गेली. पगारात किमान २५०० ते ८००० रुपये अधिक पगारवाढ मिळाली.

आज एसटीतील किमान पगार १६००० आहेत. पण त्यावर समाधान न मानता आपण सर्वांनी ऐन दिवाळीत सरकार आणि जनतेला वेठीस धरून वि्लिनिकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप करण्याचा जो निर्णय घेतला, त्याला संयुक्त कृती समितीतील एकाही संघटनेनं पाठिंबा दिलेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आंदोलन कुणी सुरु केलं. डेपोंना कुणी टाळी ठोकली. त्यांचा एसटी कर्मचाऱ्यांशी काय संबंध?

सुरुवातीला हातावर मोजता येतील एव्हढेच डेपो बंद होते. मग भाजपाचे पडळकर आणि मंडळी पुढे आली आणि त्यांनी आगीत तेल ओतत हे आंदोलन हाती घेतलं. भाजपाचे आमदार, स्थानिक पदाधिकारी डेपो डेपोत जाऊन टाळी ठोकू लागली. मग एक दोन अन्य राजकीय पक्षांनीही पोळी भाजण्याचा स्वार्थ साधला. आणि हे आंदोलन पेटवलं. मागील पाच वर्ष भाजपचं सरकार होतं. तेव्हा राज्यही आर्थिक संकटात नव्हते, मग का नाही वि्लिनिकरण केलं? उलट तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवारांनी स्पष्ट सांगितलं की ‘विलिनीकरण करता येणार नाही. आम्ही त्यांना मदत करू शकतो.’ हे उद्गार केव्हाचे आहेत, जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती उत्तम होती तेव्हाचे!

मग आता जेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीची आहे. त्यात आमच्या हक्काचे जीएसटीचे ४०,००० कोटी रुपये केंद्र सरकारने आजवर दिलेले नाहीत. त्या काळात आपण ही मागणी रेटतो आहोत, हे कुठल्या व्यावहारिक माणसाला पटेल? तेही जेव्हा एसटीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली असती, तेव्हा आम्ही संप केला हे योग्य नाही झालं. वंदनीय शिवसेनाप्रमुख म्हणायचे हक्क मागताना कर्तव्याला विसरु नका! याचा आपल्याला विसर पडला.

आम्हाला फोन करणारे, मेसेज करणारे, आम्ही शिवसैनिकच आहोत हे सांगतात त्यांच्यासाठी हे बाळकडू! शिवसेनेचे पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते किती कनवाळू आहेत हे साऱ्या जगाला माहीत आहे. त्यांना आपल्याच कर्मचाऱ्यांचं भलं करावं असं वाटत नाही का? खरं तर, आपण नोकरी महामंडळाची स्वीकारली आहे. सरकारची नाही, हे मुळातच विसरलोय. आणि वडाची साल पिंपळला लावा अशी मागणी आपण करतोय.

होय, मला हे मान्य आहे की नवीन कामगारांना पुरेसा पगार नाही, तो वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू पण आपणही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पहिले कर्तव्यावर रुजू व्हा त्यातच तुमचे, एसटी महामंडळाचे भले आहे आणि ज्यांच्या जीवावर आपण जगतो त्या प्रवाशांचे आशीर्वाद त्यामुळे आपणांसच मिळतील.

सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

जय महाराष्ट्र !!

आपला

अरविंद सावंत

(खासदार आणि अध्यक्ष, एसटी कामगार सेना)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena MP Arvind Sawant write emotional letter appeal to ST Mahamandal workers.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या