20 April 2024 8:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

पवार-शहा यांची भेट झालीच नाही, त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा - संजय राऊत

Shivsena, MP Sanjay Raut,  Amit Shah, Sharad Pawar

मुंबई, २९ मार्च: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. यासंदर्भात आज पुण्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरून सुरू झालेल्या तर्कवितर्काच्या धुळवडीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजकीय पिचकारीतून शरसंधान साधलं आहे. पवार-शहा यांची गुप्त भेट झालीच नाही. त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही हे आवाहन केलं आहे. मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Shiv Sena leader Sanjay Raut has slammed the NCP’s Sarvesarva Sharad Pawar and Union Home Minister Amit Shah. There was no secret meeting between Pawar and Shah. So stop spreading rumors. MP Sanjay Raut has said that nothing will be done.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut confirmed on fact about Amit Shah and Sharad Pawar meet news updates.

हॅशटॅग्स

#SanjayRaut(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x