15 December 2024 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

त्या ईडी'ला मी घाबरतही नाही: राज ठाकरे

MNS, Raj Thackeray, Narendra Modi, Devendra fadanvis

मुंबई : निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेलाही या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला बहुमताने निवडून येण्याचा आत्मविश्वास आहे मग त्यासाठी ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटची गरज नाही. त्यामुळे मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी या दोन्ही पक्षांनी मोर्च्यात सहभागी व्हावे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तसेच ज्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेवरून गोंधळ सुरू आहे, अमेरिका स्वत: ईव्हीएमवर मतदान घेत नाही त्या अमेरिकेत आपल्या मतदानाच्या ईव्हीएमचे चीप बनणार असेल, तर लोकांनी विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही ‘ईव्हीएमद्वारे मतदान हवे की मतपत्रिकांद्वारे’ हे जनतेकडूनच जाणून घेणार आहोत, त्यासाठी घराघरांत फॉर्म वाटले जातील. लोकांची मते घेतली जातील, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख आजच्या बैठकीला उपस्थित होते. पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आम्ही एक फॉर्म काढून ते लोकांकडून भरुन घेणार आहोत. निवडणुका बॅलेटपेपर घेण्यात याव्यात अशा मागण्यांचे फॉर्म सर्वपक्षीय कार्यकर्ते लोकांकडून भरुन घेतील. २१ तारखेला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज ठाकरे हे देखीस ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. याबद्दल राज ठाकरे यांना विचारले असता, ‘ईडीच्या चौकशीच्या बातम्या मी देखील वृत्तपत्रांत वाचल्या आहेत. मला अद्याप कुठलीही नोटीस आलेली नाही आणि मी अशा चौकशीला घाबरतही नाही,’ असं ते म्हणाले. ‘ईडीच्या चौकशीचा दबाव वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांच्या मालकांवरही आहे. पत्रकारांनाही त्यांच्या भूमिका मांडता येत नाहीएत, असा आरोप राज यांनी केला.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x