1 May 2025 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

VIDEO: सेनेच्या वचननाम्यातील विजेच्या मुद्द्यावरून मतदाराला २००९ पासून टोप्या; २०१४मध्ये सत्तेत तरी तेच

Shivsena, Vachannama 2009, Vachannama 2019, Uddhav Thackeray

मुंबई: “वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणारं नाही,” असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या या वचननाम्यात आश्वासनांची खैरात वाटण्यात आली आहे.

१० रुपयांत चांगलं सकस जेवण. तेही स्वच्छ आणि व्यवस्थित असेल. विशेषत: एका किचनमधून त्याचं वितरण केलं जाईल. महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सामावून घेतलं जाईल, असं शिवसेने वचननाम्यात म्हटलंय. या शिवाय घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलंय. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या आरोग्यचाचण्या एका रुपयात देण्याची ग्वाही वचननाम्यातून देण्यात आली आहे. तसंच अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक वर्षाला १०००० रुपये जमा करण्याचं वचन शिवसेनेनं दिलं आहे.

विशेष म्हणजे वचननाम्यातील अनेक मुद्यावरून शिवसेना मतदाराला अनेक वर्ष मूर्ख बनावत आहे असंच म्हणावं लागेल. अगदी बोलायचेच झाल्यास, घरगुती आणि व्यापारी विजेच्या मासिक बिलांवरून देखील शिवसेना मतदारासोबत खेळ खेळून त्याच विषयांवर मागील १०-१२ वर्षांपासून राजकरण करत आहे. म्हणजे २००९ निवडणुकीत देखील शिवसेनेने विजेचा मुद्दा महत्वाचा केला होता. मात्र २००९ मध्ये राज्यसरकार पुन्हा काँग्रेस-एनसीपी’च्या हातातच राहिलं. परंतु २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार आलं आणि त्यावेळी देखील विजेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर देखील विजेच्या बिलांमध्ये कोणताही फरक जाणवला नाही, त्याउलट भरमसाठ बिलं आकारली जाऊ लागल्याने घरगुती आणि व्यापारी वापराच्या विजेचे ग्राहक हैराण झाले आहेत. मात्र आश्चर्याचा धक्का यासाठी बसतो कारण तोच मुद्दा शिवसेनेने आजच्या वचणनाम्यात देखील प्रतिष्ठेचं केला आहे. मात्र याच विजेच्या मुद्यावरून शिवसेनेने जाहिरातबाजी मात्र २००९ पासून केली आहे आणि २०१४ मध्ये सरकारमध्ये आल्यावर देखील कोणताच फरक पडला नव्हता.

#VIDEO: २००९ मधील शिवसनेच्या विजेच्या मुद्द्यावरून जाहिराती;

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या