4 May 2025 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

राज्यातील ९५ टक्के चाचण्या निगेटिव्हः उद्धव ठाकरे

Covid 19, Corona Crisis, CM Uddhav Thackeray

मुंबई, १९ एप्रिल: पीपीई किटसह सर्व सुविधा डॉक्टरांना पुरवल्या जातील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला. पीपीई किट किंवा उपकरणांचा तुटवडा असल्याची सत्यता त्यांनी यावेळी मान्य केली. पण मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनी कोविड व्यतिरिक्त तपासणी करण्यासाठी क्लिनिक सुरु ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील इतर डॉक्टरांनाही त्यांनी असे करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रात आतापर्यंत ६६७९६ टेस्ट झाल्या आहेत. चांगली गोष्ट ही की यातील ९५ टक्के टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टेस्टसाठी लागणारा काळ कमी होऊ शकत नाही. परंतु, गंभीर रुग्णांच्या टेस्ट लवकर करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणतेही लक्षण म्हणजे सर्दी, खोकला, ताप आला तर लपवू नका. लवकर दवाखान्यात या, म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवता येईल, असे आवाहनही त्यांनी केले. सुमारे ६७ हजार टेस्टपैकी ३०६६ रुग्ण आढळून आले आहेत. अनेक जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, मानसिक स्वास्थ्यासाठी, एकटेपणा टाळण्यासाठीही दोन क्रमांक मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महापालिका आणि बिर्ला यांची संयुक्त सेवा असून त्यासाठी १८०० १२० ८२००५० हा क्रमांक आहे. तर आदिवासी विभागाकडून तसेच प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्ला यांच्याकडूनही सेवा देण्यात येत आहे. त्यासाठीचा क्रमांक ८२११ १८०० १०२ ४०४० असा आहे. घरात राहून आपल्याला मानसिक स्वास्थ बिघडल्याचं किंवा एकटेपणा जाणवत असेल तर या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has assured that all facilities including PPE kit will be provided to doctors. Today, he again communicated through Facebook Live. He acknowledged the fact that the PPE kit or equipment was lacking. But doctors across the state, including Mumbai, have promised to continue the clinic for Covid examination. He urged other doctors across the state to do the same.

News English Title: story 95 percent Corona virus test negative in Maharashtra says Chief Minister Uddhav Thackeray Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या