नवी मुंबईतील महापे स्थित आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नवी मुंबई, २२ एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही सध्याच्या घडीची अत्यंत दिलासादायक बाब समोर येत आहे. आतापर्यंत कोरोनातून सावरलेल्या एकूण ७२२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून त्यात २८१ महिलांचाही समावेश आहे.
राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची आहे. ज्यामध्ये ३७४ रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. कोरोनाचं संकट बळावतानाच राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे हे नाकारता येणार नाही.
मात्र आता नवी मुंबईतून चिंता वाढवणारी बातमी आली आहे. नवी मुंबईतील एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतल्या महापे एमआयडीतीली आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या ४० कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती.
यामधील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे बुधवारी समोर आले. एका खासगी लॅबमध्ये त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी वाशी येथील एनएमएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महापे येथील या आयटी कंपनीमध्ये बँकेच्या डेटाबेसचे काम केले जाते.
News English Summary: News from Navi Mumbai has raised concerns. A corona infection has affected 19 employees of an IT company in Navi Mumbai. The corona was inspected by 40 employees of an IT company at Mahape MIDC in Navi Mumbai.
News English Title: Story Corona virus 9 employees of IT Firm in Navi Mumbai Test Covid 19 positive Corona Crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK