3 May 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा १८९५वर; राज्य तीन विभागात विभागणार

Covid19, Corona Crisis, Maharashtra Divided in zones

मुंबई, १२ एप्रिल: राज्यातील करोनाचं संकट काही कमी होताना दिसत नाही. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ नवे करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरी आव्हान आणखी वाढले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ करोना रुग्ण आढळले असून त्यात आज दिवसभरात सापडलेल्या १३४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच गेल्या २४ तासांत १७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १२७वर गेली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे. रेड, ऑरेंज, ग्रीन अशा तीन झोनमध्ये राज्यातल्या जिल्ह्यांची विभागणी झाली असून त्याप्रमाणे जिल्हा पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

रुग्णसंख्येनुसार राज्यातील जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आलं आहे. ग्रीन झोनमध्ये धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीचा समावेश आहे.

दुसरीकडे, देशात कोरोनाचे थैमान वाढतच चालले आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३०० च्या वर गेली आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूचा धोका पाहता लॉकडाऊन वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार देशाला तीन झोनमध्ये विभागण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ प्रकरणांच्या संख्येच्या आधारावर देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यावर विचार सुरु आहे.

 

News English Summary: Meanwhile, the state has been divided into three zones to prevent the outbreak of corona. Districts of the states have been divided into three zones: Red, Orange and Green.

News English Title: Story corona virus Maharashtra government divides state in three zones number corona patients Covid19 News latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या