18 May 2022 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 100 रुपयांपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करा | दीर्घकाळात मिळेल कोटींचा निधी Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा Investment Tips | तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न राहायचे असल्यास या टिप्स फॉलो करा | फायद्यात राहाल LIC Share Price | एलआयसीचे शेअर्स दुसऱ्या दिवशी तेजीत | आता तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या Ethos IPO | आजपासून इथॉस आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी | तपशील जाणून घ्या Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
x

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार, एकाचं अजित पवारांविरुद्ध डिपॉझिट जप्त झालेलं

BJP Maharashtra, Vidhanparishad

मुंबई, ८ मे: भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

धनगर समाजाचे नेते आणि लोकसभेत वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढले होते. तेथे त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. पडळकर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात. पडळकर यांना संधी देतानाच धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना शह देण्यात आल्याचे मानले जाते. जानकर हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

भाजपकडून दुसरं महत्वाचं नाव आहे ते रणजितसिंह मोहिते पाटलांचं. मोहिते-पाटील घराणे सोलापूरमधलं राजकीय प्रस्थ आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील दीर्घकाळ मंत्री आणि काहीकाळ उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

नागपूरचे प्रवीण दटके हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान शहराध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे. संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या महाल भागातून अनेक टर्म नगरसेवक आहेत. विधानसभेला त्यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी निर्माण झाली होती. भाजपचे चौथे उमेदवार डॉ. अजित गोपछडे हे तसे नवखा चेहरा आहे. विद्यार्थी दशेपासून संघाशी निगडित असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपछडे नांदेडचे आहेत. अंबाजोगाई इथं वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या गोपछडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. सध्या ते भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजप नेतृत्त्वाने चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली होती. तर पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात पराभव झाला होता. त्यामुळे हे सर्व नेते पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. एकनाथ खडसे यांनी अलीकडे राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. तर काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे भाजपकडून या नेत्यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल, असा अंदाज होता.

 

News English Summary: On behalf of the Bharatiya Janata Party, former MP Ranjit Singh Mohite Patil, Dhangar Samaj leader Gopichand Padalkar, former mayor of Nagpur Praveen Datke and Dr. Nanded. Ajit Gopchhede has been nominated for the Legislative Council. Therefore, the discussion on prolonging the political rehabilitation of former ministers Eknath Khadse, Pankaja Munde, Vinod Tawde and Chandrasekhar Bavankule has now started in the political circles.

News English Title: Story Maharashtra BJP declared candidates for Vidhanparishad Election 2020 News latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(690)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x