16 December 2024 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मांडव्याच्या दिशेनं जाणारी बोट बुडाली, ९० प्रवाशांची सुटका

sinking Yacht, Arabian sea, Boat capsized at Mandwa, News Latest updates

रायगड: मुंबईतील गेटवरून शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास सुटलेल्या लाँचला अपघात झाला आहे. ही लाँच मांडवाजवळ बुडायला लागल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. या लाँचमधून ९० प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलीस कर्मचारी आणि कोस्टगार्डच्या मदतीनं सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

ही दुर्घटना इतकी भीषण होती की लाँच बुडायला लागली होती. एका बाजुला झुकलेल्या लाँचमध्ये पाणी घुसल्यानं प्रवाशांचीही घाबरगुंडी उडाली होती. ही लाँच मुंबईहून अलिबागला सकाळी ९ वाजता निघाली होती. मात्र अचानक मांडव्याच्या दिशेनं निघालेली असतानाच लाँचला अपघात झाला. सुरुवातील तिथल्या काही मच्छमारांना या लाँचवर काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी तातडीनं धाव घेत लाँचवरील प्रवाशांना धीर देऊन सुखरुप बाहेर काढलं आहे.

लाँचचा अपघात नेमका कसा झाला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. या संदर्भात चौकशी करण्यात येणार आहे. मात्र मच्छीमार आणि पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचले नसते तर मोठा अनर्थ घडू शकला असता. बोट बुडू लागताच त्यातील प्रवासी घाबरले. सद्गुरू कृपा या बोटीतून पेट्रोलिंग करणारे पोलीस तातडीने बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी बोटीतील ९० जणांना वाचवले. तर अन्य ८ प्रवाशांना खासगी बोटीने सुखरूप मांडावा बंदरावर उतरवले.

 

News English Summery: The missing Yacht occurred around 9 AM on Saturday morning from the gate in Mumbai. The launch was a big mess as it began to sink near Mandava. 90 passengers were traveling through this launch. All passengers have been successfully evacuated. With the help of police personnel and the Coast Guard, all the passengers have been able to escape. The tragedy was so severe that the launch was imminent. The passengers were also scared as the water infiltrated the launch on one side. The launch was scheduled to depart from Mumbai at 9 am to Alibaug. However, it was a sudden accident while launching in the direction of Mandavi. Some fishermen in the beginning noticed that something was wrong with the launch. They have made a quick exit and have been safely evacuated by the passengers at the launch.

 

News English Title: Story Mumbai Gate way of India 90 escape from sinking Yacht in the Arabian sea boat capsized at Mandwa News Latest updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x