13 July 2020 7:36 AM
अँप डाउनलोड

पुणे: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; अपघात बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Father and Daughter Dead in accident

पुणे: यात्रेसाठी गावी जाणाऱ्या बाप-लेकीवर वाटेतच काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तीन वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीवरील पुलावर शनिवारी ही घटना घडली. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील (वय-३५), मुलगी आरोही सतीश वळसे-पाटील (वय-३, सर्व रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) अशी मृत बाप-लेकीची नावे आहेत. सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील यांची जयश्री या जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वळसे-पाटील कुटुंबीय थापलिंग यात्रेनिमित्त गावाला निघाले होते. पण, सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.१५ जी.बी. ७२७५) भीमानदी पुलावर पाठीमागून दुचाकीला ( एमएच १४ डीएल १५५७ ) जोरदार धडक दिली. यामध्ये सतीश वळसे-पाटील व मुलगी आरोही हे दोघेही ट्रकच्या पाठीमागील चाकाच्या खाली येऊन जागीच मृत्यूमुखी पडले. तर, पत्नी जयश्री याही गंभीर जखमी झाल्या आहेत.

या अपघातानंतर, परिसरातील नागरिकांनी मुलगी व वडिलांना तत्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

 

Web Title:  Father and Daughter died in road accident at Pune Rajgurunagar.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Accident(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x