14 December 2024 5:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

राज्यात २६०८ नवे कोरोना रुग्ण, ६० मृत्यू, एकूण संख्या ४७ हजारांच्या पुढे

Covid 19, Maharashtra

मुंबई, २३ मे: राज्यात करोनामुळे आणखी ६० जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात करोनाचे २६०८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर त्याचवेळी ८२१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा ५० हजारच्या दिशेने मार्गक्रमण करत असून आज हा आकडा ४७,१९० वर पोहचला आहे. सध्या प्रत्यक्षात ३२,२०१ करोना बाधित रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

आज झालेल्या ६० मृत्यूंपैकी ४० मृत्यू मुंबईत, १४ पुण्यात, २ सोलापुरात, १ वसई-विरारमध्ये, १ सातऱ्यात, १ ठाण्यात आणि १ नांदेडमध्ये नोंदवला गेला आहे. ज्या ६० जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये ४१ पुरुष आणि १९ महिला होत्या. ६० पैकी २९ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे होते. तर २४ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. इतर ७ जण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मागील २४ तासांमध्ये झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३६ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते.

मुंबई शहरातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीत शनिवारी आणखी ३३ जणांची COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर संपूर्ण मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५६६ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८८१७ इतका झाला आहे.

 

News English Summary: Corona has killed another 60 people in the state. Today, 2608 new cases of corona have been detected during the day while 821 patients have succeeded in overcoming corona.

News English Title:  Today 2608 new covid 19 cases found in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x