12 August 2020 2:07 PM
अँप डाउनलोड

यवतमाळ अपहरणनाट्य: मास्टरमाईंड भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे गृहमंत्र्यासोबत फोटो

Devendra Fadanvis, Chief Minister Devendra Fadanvis, CM Devendra Fadanvis, BJP Yuva Morcha, BJP Yuva Morcha leader

यवतमाळ : व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करून ५० लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा देखील समावेश असून शुभम टोलवानी असं त्याचं नाव आहे. क्रिकेटच्या सट्ट्यात पैसे हरल्यामुळे त्याने व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून पैसे कमावण्याचा शॉर्टकट स्वीकारला होता आणि त्यात पुरता फसला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विशेष म्हणजे याच आरोपी शुभम टोलवानीचे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो देखील समाज माध्यमांवर वायरल झाले आहेत. अपहरणकर्त्यानी यवतमाळच्या शिवाजी गार्डन परिसरातून ईश्वर नचवानी या व्यावसायिकाच्या १८ वर्षीय मुलगा हर्ष नचवानी याच अपहरण केलं होतं. ही घटना भर दिवसा म्हणजे सकाळी अकराच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून अपहरण करताना अनेकांनी अनुभवलं होतं.

त्यानंतर भेदरलेल्या नचवानी कुटुंबाने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण यंत्रणा खर्ची पाडून काही तासांच्या आताच गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यानंतर हर्ष नचवानी घरी सुखरूप परतला होता. या प्रकरणामुळे भाजपदेखील तोंडघशी पडली असून पक्षात कशा प्रकारच्या लोकांना प्रवेश आणि पद दिली आहेत असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x