मुंबई, 29 डिसेंबर 2025: मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणुक 2026 मराठी माणसासाठी एका महत्वाच्या टप्प्यावर उभी आहे, आणि या वेळी राजकीय परिस्थितीत एक ऐतिहासिक वळण आलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी जुने तंटे विसरून एकत्र येण्याची घोषणा केली आहे.

अमराठी देखील मुंबईत फटाके फोडेल

दोन ठाकरेंची ही युती फक्त ठाकरे कुटुंबाची एकता नसून, तर मराठी माणसाची ओळख आणि हक्क सुरक्षित ठेवण्याचा एक ठोस पाऊल आहे असं म्हटलं जातंय. जर ठाकरे बंधूंच्या या युतीने निवडणुक जिंकल, तर मुंबईच्या मराठी आत्म्याला वाचवण्याची एक सुवर्णसंधी ठरेल. अन्यथा, गैर-मराठी राजकीय नेते मुंबईची ओळख मिटवण्यात आणखी जलद होतील आणि केवळ मुंबईच्या ‘अर्थकारणावर’ डोळा ठेऊन असणारा अमराठी देखील मुंबईत फटाके फोडेल असं देखील म्हटलं जातंय.

मराठी माणसाची ओळख संकटात

मुंबई, जी कधी ‘मराठी माणसाचा’ गड होतं, आज अमराठी लोकांच्या मोठ्या संख्येमुळे आपली मूळ भाषिक आणि सांस्कृतिक ओळख हरवत आहे. हिंदी बोलणाऱ्यांची आणि इतर भाषिक लोकसंख्येचं प्रमाण पाच पट वाढलं आहे, तर मुंबई आणि ठाण्यासह अनेक शहरांमध्ये मराठी भाषिक हळूहळू अल्पसंख्यांक होत चालले आहेत. भाषा ही कोणत्याही समाजाची ओळख असते, जर मराठी भाषाच मुंबईत संपली तर मराठी माणसाचं अस्तिव तरी काय शिल्लक राहणार हाच गंभीर प्रश्न आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत मोठया प्रमाणात गुजराती आणि युपी बिहारचे आमदार-खासदार आणि नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, आणि आता ती एक-तृतीयांश झाली आहे. त्यामुळे मराठी माणसाची बाजू संसदे-विधानसभे’पासून ते महापालिकेत मांडणार तरी कोण हाच प्रश्न आहे. मात्र, त्याउलट हेच मुंबई ठाण्यातून निवडून येणारे अमराठी खासदार-आमदार-नगरसेवक मराठी विरोधी भूमिका घेताना जराही विचार करणार नाहीत.

राष्ट्रीय पक्षांना मराठीचं काहीच देणंघेणं नाही

तसेच राष्ट्रीय पक्षांना मराठीचं काहीच देणंघेणं नाही हे तर त्याहून अधिक गंभीर आहे. अमराठी राजकीय नेते, मुंबईला बहुभाषिक महानगर बनवण्याच्या नावाखाली मराठी संस्कृती, भाषा आणि रोजगाराच्या संधींना हानी पोहचवत आहेत. ते जाणीवपूर्वक अमराठी लोकांना प्राधान्य देऊन आपले मतदारसंघ मजबूत करत आहेत. त्यामुळे मराठी तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित करण्यात एक लॉबी कार्यरत होऊ शकते. धक्कादायक म्हणजे, २००० नंतर जन्माला आलेल्या मराठी तरुण-तरुणांनी तर 1956 मध्ये मुंबईला महाराष्ट्राचा भाग करण्यासाठी लढलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल आणि त्याचं गुजरात कनेक्शन याबद्दल जराही कल्पना नाही.

अमराठी नेते मुंबईचा उच्चार ‘आर्थिक राजधानी’ करतात आणि त्यामागील त्यांचा उद्धेश देखील आपला हक्क सांगण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मुंबईची मूळ ओळख जाणीवपूर्वक दाबत आहेत. उदाहरण म्हणून, अलीकडच्या वर्षांत BMC च्या निर्णयांत स्थलांतरित समुदायांच्या हितांना जास्त प्राधान्य दिलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना मराठीची काही पडलेलीच नाही हे देखील स्पष्ट होतंय. हे चालूच राहिलं, तर मुंबईचा मराठी आत्मा पूर्णपणे मिटून जाईल असं म्हटलं जातंय.

राज आणि उद्धव ठाकरेचे मराठी माणसाची बाजू खुलेआम घेऊ शकतात

शिवसेना फुटीनंतर राज्यात मराठी संबंधित अनेक विषय पेटले होते आणि त्यावेळी एकनाथ शिंदे कुठेही दिसले नव्हते. त्यातून एकनाथ शिंदे सुद्धा अमराठी मतांसाठी किती लाचार आहेत हे सिद्ध आहेत, तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये मराठी भाषिकांच्या बाजूने गुजरातबद्दल बोलण्याची हिम्मतच नाही हे देखील अनेकदा सिद्ध झालंय.

ठाकरे विजयी झाले तरच….

ठाकरे विजयी झाले तर मुंबईतील मराठीला बळ मिळेल आणि अमराठी चेहरे नियंत्रणात राहतील. तसेच रोजगार, शिक्षण आणि मराठी संस्कृतीला पुन्हा सकारात्मक दिशा देण्यास बळ मिळू शकतं. निवडणुकीच्या तोंडावर अमराठी लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या गैर-मराठी नेत्यांच्या धोरणांना देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे मजबूत ठाकरे बाण्याचे नेतेच मुंबईची खरी ओळख जपू शकतात. त्यांचा कौटंबिक वारसा देखील मराठी माणसाच्या आशा आणि अपेक्षा जिवंत ठेवतो हे वास्तव आहे. सामान्य मराठी माणसासाठी रस्त्यावर केवळ राज ठाकरेंचे कार्यकर्ते आणि सच्चे शिवसैनिकच उतरू शकतात हे देखील मराठी माणसाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मराठी माणसा जागा हो!

बीएमसी निवडणूक 2026 मराठी लोकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. राज आणि उद्धव ठाकरे जिंकले तर मुंबईची ओळख कायम राहील, नाहीतर अमराठी शक्ती मुंबईवर भाषिक, आर्थिक आणि संस्कृतिक पातळीवर शेवटचा घाव मारेल अशी शक्यता आहे. दिल्लीतील गुजरात लॉबी तर त्याच दिवसाची वाट पाहतेय आणि त्यामुळे दिल्लीतील स्थानिक पक्ष आणि मराठी नेत्यांना शांत राहून संपवण्याची रणनीती समोर न येता आखत असतात. त्यासाठीच गुजरात लॉबीने मराठी भाषिक लोकांची बाजू घेणार नाहीत असे नेते राज्याच्या सर्वोच्य ठिकाणी बसवले आहेत.

Marathi vadhu var suchak trusted matrimony

मराठी मतदारांनो सावध रहा! एकी दाखवा, अन्यथा अमराठी मुंबईत फटाके फोडतील