
3i Infotech Share Price | 3i इन्फोटेक कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, 3i इन्फोटेक कंपनीला उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने मोठी ऑर्डर दिली आहे. या बातमीनंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरमध्ये देखील जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 53.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3i इन्फोटेक कंपनीला 40 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी 3i इन्फोटेक स्टॉक 0.48 टक्के घसरणीसह 41.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 2.57 टक्के वाढीसह 55.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ऑर्डर तपशील
3i इन्फोटेक कंपनीला 40 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 42.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3i इन्फोटेक कंपनीला उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने एंड यूजर सपोर्ट सर्व्हिस (वर्कप्लेस सर्व्हिसेस) प्रदान करण्यासाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.
या करारची मुदत 5 वर्ष असेल. 3i इन्फोटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 46.35 रुपये होती. उज्जीवन स्मॉल फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे.
20 मार्च 2023 रोजी उज्जीवन स्मॉल बँकेचे शेअर्स 23.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 सप्टेंबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 53.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 149 टक्के परतावा कमावून दिला आहे. या बँ केच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 21.25 रुपये होती. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे बाजार भांडवल 10430 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.