
7/12 Utara | वारसाने मिळालेली संपत्ती प्रत्येकालाच हवीशी असते. मात्र ती कशी मिळते हे आजही अनेकांना माहिती नाही. आजोबा वारल्यावर ही संपत्ती वडिलांच्या नावे होते. तसेच वडिल वारल्यानंतर यावर मुलांचा हक्क असतो. त्यासाठी आधी 7/12 उता-यावर नाव लावले जाते. यात बरीच कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामुळे या बातमीतून याच विषयीची माहिती जाणून घेउ.
महसुल अधिनियम 1966 कलम 149 मार्फत वारसा हक्क दिला जातो. या कलमा अंतर्गत जेव्हा तुम्हाला 7/12 उता-यावर तुमचे नाव लावायचे असते तेव्हा मृत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला सादर करावा लागतो. हा दाखला गावी राहणा-या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर ग्रामपंचायत जन्म मृत्यू विभागातून दिला जातो. तसेच शहरात महानगरपालिका किंवा नगरपरिशद अशा ठिकाणी मिळतो.
जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा लगेचच मृत्यू पत्र सादर करावे लागते. तसेच 7/12 वर नाव लावण्यासाठी ३ महिन्यांच्या आत अर्ज करावा लागतो. हा अर्ज करताना मृत्यूचा दाखला, त्या व्यक्तीचे गाव आणि एकूण वारसदारांची संख्या ही माहिती द्यावी लागते.
व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर वारसा हक्कासाठी त्याची नोंद करावी. त्यानंतर झालेल्या नोंदणी प्रमाणे दिलेली माहिती खरी आहे का हे तपासले जाते. यात गावातील सरपंच, पोलिस पाटील यांच्याशी बातचीत केली जाते.
वारसा नोंदणी करताना त्या व्यक्तीची सर्व माहिती मिळवल्यावर न्यायालयीन पत्रक जारी केले जाते. १५ दिवसांत या वारसा हक्कावर कोणी अक्षेप घेतला तर त्याची योग्यती चाचपणी केली जाते. तसेच तो पर्यंत कोणीही हरकत दाखवली नाही तर अर्ज मंजूर होतो. इथे तलाठी अहवाल देखील सादर करावा लागतो.
वारसा हक्क नोंदणीसाठी तुमच्याकडे रेशन कार्ड, विहित कोर्ट फी स्टॅंप, शपथपत्र, वारस हक्क प्रमाणपत्र आणि नॉमिनी मागितला जातो. बॅंक, विमा अशा ठिकाणी जी व्यक्ती नॉमिनी आहे तिचे दस्ताएवज सादर करावे लागतात. त्यानंतर मृत व्यक्तीची जमा रक्कम नॉमिनीला दिली जाते. वारसा हक्काचा नियम त्या व्यक्तीच्या जाती नुसार लागू केला जातो.