
7th Pay Commission | महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी बातमी मिळू शकते. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मार्चमध्ये सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करू शकते. चार टक्के वाढीनंतर डीए आणि डीआर 50 टक्क्यांच्या पुढे जाईल. डीए आणि डीआरमध्ये दरवर्षी 2 वेळा वाढ केली जाते. ही वाढ जानेवारी आणि जुलैमध्ये केली जाते.
DA मध्ये शेवटची वाढ कधी करण्यात आली?
शेवटची डीएम वाढ ऑक्टोबर 2023 मध्ये करण्यात आली होती. जेव्हा महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली. ज्यानंतर महागाई भत्ता 46 टक्क्यांवर पोहोचला होता. सध्याच्या महागाईनुसार सरकारकडून महागाई भत्त्यात पुन्हा ४ टक्के वाढ केली जाऊ शकते, असा अंदाज आहे. महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मार्चमध्ये झाल्यास 1 जानेवारी 2024 पासून त्यात भर घालून सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
DA-DR कशाच्या आधारे ठरवला जातो?
औद्योगिक कामगारांचा महागाई भत्ता केंद्र सरकार सीपीआय डेटावर (CPI-IW) ठरवते. ही 12 महिन्यांची सरासरी 392.83 इतकी आहे. त्यानुसार डीएम मूळ वेतनाच्या 50.26 टक्के असावा. कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याला सीपीआय-आयडब्ल्यूची आकडेवारी जाहीर केली जाते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.