30 April 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल
x

Adani Green Share Price | मल्टिबॅगर अदानी ग्रीन एनर्जी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची अपडेट आली समोर

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने आपले चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 148 टक्क्यांच्या वाढीसह 256 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 103 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.1 टक्के वाढीसह 1750 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरणीसह 1,701.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1,798.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 439.38 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,71,851.65 कोटी रुपये आहे.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने सेबीला माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 2,675 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 2,256 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीनी माहिती दिली की, नुकताच जाहीर करण्यात आलेल्या इक्विटी आणि डेट कॅपिटल इन्फ्युजनसह कंपनीने 2030 पर्यंत 45 GW क्षमता साध्य करण्यासाठी भांडवली व्यवस्थापन फ्रेमवर्क तयार केले आहे. यासह कंपनी आपल्या लवचिक पुरवठा साखळीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. आणि स्थानिकीकरण, मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन, कार्यबल विस्तार आणि क्षमता वाढीवर अधिक भर देत आहे.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनी गुजरातमध्ये खबरा याठिकाणी जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. या कंपनीची ऑपरेटिंग क्षमता एका वर्षात 16 टक्क्यांच्या वाढीसह 8,478 मेगावॅटवर पोहचली आहे. एप्रिल- डिसेंबर 2023 या कालावधीत कंपनीची वीज विक्री वार्षिक 59 टक्क्यांच्या वाढीसह 16,29.3 युनिटवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 30 January 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x