
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही कंपनी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहे. जून तिमाहीतील अनऑडिटेड आणि स्वतंत्र आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी कंपनीने 1 ऑगस्ट 2024 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 3,225.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
इनसाइडर ट्रेडिंगच्या प्रतिबंधासाठी सेबीच्या आचारसंहिता नियमानुसार 1 ऑगस्ट 2024 रोजी जून तिमाहीचे निकाल सार्वजनिक झाल्यानंतर अदानी एंटरप्रायझेस स्टॉकची ट्रेडिंग विंडो 48 तासांसाठी बंद केली जाईल. या काळात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आपले शेअर्स विकू शकणार नाही, किंवा नवीन शेअर्स खरेदी करू शकणार नाही. मार्च 2023 तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 37.63 टक्के घट नोंदवली होती. याच तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीने 722.48 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला होता.
बुधवारी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 3169.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या शेअरने दिवसभरात 3197.00 रुपये ही इंट्राडे उच्चांक किंमत स्पर्श केली होती. तर 3140.00 रुपये ही इंट्राडे नीचांक किंमत स्पर्श केली होती. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6.75 टक्क्यांनी वाढली आहे.
मागील एका महिन्यात अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.20 टक्क्यांनी घसरला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 5506.05 टक्के वाढवले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.