12 December 2024 8:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

भारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना | प्रति सेकंदाला एक ई-स्कूटर बनवणार

Ola, E scooter, Largest factory, Tamil Nadu

मुंबई, १० मार्च: ओला इलेक्ट्रिक ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. याला तामिळनाडू येथील कंपनीच्या ५०० एकर जमिनीवर पसरलेल्या प्लांटमध्ये बनवले जाणार आहे. कंपनी दक्षिणी राज्यातील कृष्णागिरी जिल्ह्यात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लांट बनवणार आहे. ओला आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील बाजारात आपली २० लाखांहून जास्त इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करीत आहे. (Ola largest E scooter factory in Tamil Nadu)

तमिलनाडुच्या कृष्‍णागिरी जिल्ह्यात ५०० एकर जागेत हा कारखाना उभा राहणार असून यात दर दोन सेकंदाला एक स्‍कूटर तयार होईल. कंपनीचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. या कारखान्याद्वारे १० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल, असंही अग्रवाल म्हणाले. कारखान्याचा पहिला टप्पा १ जून २०२१ मध्येच सुरू होईल, पहिल्या टप्प्यात वर्षाला २० लाख प्रोडक्शनची क्षमता असेल असं अग्रवाल यांनी सांगितलं.

काही दिवसांपुर्वीच ओला भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता याबाबतचा एक व्हिडीओ कंपनीचे ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. कारखान्यात कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्याकडे कंपनीचा कल असणार आहे. याशिवाय कंपनीच्या स्कूटर चागंले मायलेज देणार असल्याचे बोलले जात आहे.

 

News English Summary: Ola Electric has officially released a photo of its first electric scooter in the Indian market. It will be built at the company’s 500-acre plant in Tamil Nadu. The company plans to build the world’s largest electric two-wheeler plant in Krishnagiri district in the southern state. Ola sells more than two million electric scooters in Asia, Europe and South America.

News English Title: Ola largest E scooter factory in Tamil Nadu news updates.

हॅशटॅग्स

#cars Bikes(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x