1 May 2025 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक तगडा परतावा देणार, फायदा घ्या

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. लवकरच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स सेन्सेक्समध्ये विप्रो कंपनीची जागा घेतील अशी अपेक्षा आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. आणि 21 जून रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सेन्सेक्समध्ये सामील केला जाईल. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.28 टक्के वाढीसह 3,396.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गौतम अदानी यांच्या मालकीची अदानी एंटरप्रायझेस ही कंपनी BSE पॅकमध्ये प्रवेश करणारी अदानी समूहाची पहिलीच कंपनी ठरली आहे. अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सेन्सेक्समध्ये सामील होण्याच्या बातम्या आल्या आणि शेअर 8.58 टक्के वाढीसह 3,409.05 रुपये किमतीवर पोहचला होता.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे 3.37 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या कंपनीच्या मागील दोन आठवड्यांची सरासरी ट्रेडिंग व्हॉल्यूम 1.05 लाख शेअर्स होती. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,86,597.18 कोटी रुपये आहे.

नुकताच अदानी समूहाने एका बातमीवर आपले स्पष्टीकरण जाहीर केले आहे. अदानी समूहाने दशक भरापूर्वी राज्य सरकारच्या मालकीच्या वीज निर्मिती कंपनीला उच्च दर्जाचा कोळसा पुरवठा करण्याऐवजी निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा केला होता. याबाबत अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अदानी ग्रुपच्या प्रवक्त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आणि सर्व आरोपांना खोटे आणि निराधार म्हटले आहे.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षात 37.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 52.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 16.44 टक्के मजबूत झाले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 11.98 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 24 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या