17 June 2024 2:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

Suzlon Share Price | ब्रेकआऊटचे संकेत? सुझलॉन स्टॉक तेजीत धावणार, नवीन अपडेटनंतर शेअर मोठा परतावा देणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारी 5 टक्के वाढीसह 46.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीला ज्युनिपर ग्रीन एनर्जी कंपनीकडून 402 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीची ऑर्डर देण्यात आली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनी राजस्थानच्या फतेहगड येथे दोन प्रकल्पांचे काम करणार आहे. ज्युनिपर ग्रीन कंपनीने प्रस्तावित केलेल्या जागेवर तीन मेगावॅट क्षमतेचे हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवर आणि एकूण 134 विंड टर्बाइन जनरेटर उभारण्याचे काम सुझलॉन एनर्जी कंपनीला देण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.93 टक्के घसरणीसह 47.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांनी आपल्या निवेदनात माहिती दिली की, “ज्युनिपर ग्रीन एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जी कंपनीची जुनी ग्राहक आहे. त्यांच्यासोबत पुन्हा भागीदारी करण्यात आम्हाला आनंद होत आहे. या करारामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीला राजस्थानमध्ये व्यवसाय विस्तार करण्यास मदत होणार आहे”.

ज्युनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, “सुझलॉन एनर्जी कंपनीचे अतुलनीय तंत्रज्ञान आणि विस्तृत EPC क्षमता आम्हाला किफायतशीर, मेड-इन-इंडिया अक्षय ऊर्जा सोल्यूशन्सद्वारे मजबूत भारत निर्माण करण्याचे आमचे ध्येय पूर्ण करण्यास मदत करत आहे”.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 15 मे रोजी 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या किमतीवरून हा स्टॉक 14 टक्क्यांनी वाढून 46 रुपये किमतीवर आला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 24 May 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(156)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x