15 December 2024 8:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

कोरोना काळात औद्योगिक वीज वापरात घट | तर घरगुती-कृषी वापर वाढल्याने महावितरणला 7,500 कोटी रुपयांचा फटका

Minister Nitin Raut

मुंबई, १६ सप्टेंबर | कोविड काळात एका बाजूला महागडी वीज खरेदी करणाऱ्या औद्योगिक-वाणिज्यिक ग्राहकांच्या (सबसिडायजिंग ग्राहक) अपेक्षित वीज वापरात राज्यात मोठी घट झाली, तर दुसऱ्या बाजूला कमी दराने वीज खरेदी करणाऱ्या घरगुती आणि कृषी ग्राहकांच्या (अनुदानित ग्राहक) वीज वापरात मोठी वाढ हाेती. परिणामी सन २०२०-२१ कोविड काळात महावितरण कंपनीला तब्बल ७ हजार ५०० कोटींचा फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे.

कोरोना काळात घरगुती-कृषी वापर वाढल्याने महावितरणला 7 हजार 500 कोटी रुपयांचा फटका – Domestic agricultural consumption of electricity in the state increased during corona period which hit MSEDCL :

राज्याला ऊर्जा पुरवणारी राज्य सरकारची महावितरण कंपनी मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. महसुली तूट वाढण्यास वीज ग्राहकांची थकबाकी कारणीभूत असल्याचा सर्वसाधारण समज होता. मात्र कोरोनाकाळात वीज वापराचे बदललेले गणित हेच महावितरणची तूट वाढण्यास कारण असल्याचे दिसून आले. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात महावितरण कंपनीचा महसुली खर्च ७८ हजार कोटी इतका होता, तर प्रत्यक्ष जमा महसूल ६५ हजार २५० कोटी इतका होता. परिणामी कोविड काळातील महावितरणची महसुली तूट १२ हजार ७५१ कोटींवर गेली. या महसुली तुटीचा परिणाम म्हणून महावितरणवरचे कर्ज ३ हजार ८१९ कोटींनी वाढून ४२ हजार ९७१ कोटींवर पोहोचले आहे.

सन २०१९ मध्ये महावितरणाचा वीज वापर १ लाख ७ हजार ८८१ दशलक्ष युनिट (दलयु) होता. तो २०२०-२१ मध्ये १ लाख ९ हजार ५१३ दलयु झाला. म्हणजे कोरोनाकाळात वीज वापर १,६३२ दलयु वाढूनही महावितरणला महसुलात मात्र वाढ होण्याऐवजी ७ हजार ५०० कोटींचे नुकसान सोसावे लागले. हे सर्व केवळ वीज ग्राहकांच्या वापरात झालेल्या बदलाने झाल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. सन २०१९-२० मध्ये महावितरणच्या वसुलीचे प्रमाण ८८.१२ टक्के, तर २०२०-२१ मध्ये ८६.७८ टक्के होते. याचा अर्थ महावितरणाला महसुली तुटीचा बसलेला फटका केवळ थकबाकीमुळे बसलेला नसून वीज वापरातील ग्राहकांच्या बदललेल्या गणिताने बसला आहे.

एकंदरच कोरोनामुळे उद्योग, व्यापार, खासगी नोकरदार यांचे कंबरडे मोडले तसेच महावितरणचे मोडले. मात्र त्याला सबसिडायजिंग ग्राहकांचा वीज वापर घटून सबसिडाइज्ड ग्राहकांचा वाढलेला वीज वापर कारणीभूत ठरला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Domestic agricultural consumption of electricity in the state increased during corona period which hit MSEDCL.

हॅशटॅग्स

#MahaVitaran(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x