
Adani Enterprises Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील एका महिन्यात अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर 32.10 टक्के वाढले आहे. 61 मोठ्या ब्लॉक डीलमुळे अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरमध्ये 1021 कोटी रुपये गुंतवणुकीचे आगमन झाले आहेत.
अदानी एंटरप्रायझेस कंपनीमध्ये एकूण 40.34 लाख शेअर्सची ब्लॉक डील झाली. ही डील 2531 रुपये सरासरी किमतीवर झाली होती. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 2,537.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी ट्रान्समिशन स्टॉकमध्ये 6 ब्लॉक डील
अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या स्टॉकमध्ये 6 ब्लॉक डील पार पडल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, भारती एअरटेल स्टॉकमध्ये 288 कोटी रुपये मूल्याचे 7 ब्लॉक डील पार पडल्या. एअरटेलमध्ये 801 रुपये सरासरी किमतीवर 35.93 लाख शेअर्सची ब्लॉक डील पार पडली आहे. HDFC कंपनीच्या स्टॉकमध्ये 228 कोटी रुपये मूल्याचे 5 ब्लॉक डील झाले आहेत. 861000 शेअर्सची ब्लॉक डील 2653 रुपये सरासरी किमतीवर झाली होती.
स्टार्ट हेल्थ ब्लॉक डील
स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये देखील 668 कोटी रुपयेच्या ब्लॉक डील पार पडल्या आहेत. मागील आठवड्यात स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला मोठ्या घसरणीला सामोरे जावे लागले होते. या कंपनीचे शेअर्स 8 टक्के पेक्षा जास्त खाली आले होते. नुवामा फर्मच्या अहवालानुसार स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये 668 कोटी रुपये मूल्याचे एकूण 12 ब्लॉक डील पार पडले होते. तर 1.21 कोटी रुपये मूल्याचे ब्लॉक डील 551 रुपये सरासरी किमतीवर पार पडले. स्टार हेल्थ कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी 0.86 टक्के वाढीसह 543.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
17 स्टॉकमध्ये ब्लॉक डील
नुवामा फर्मच्या रिपोर्टनुसार, ITC, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, अदानी ट्रान्समिशन, इंटरग्लोब एव्हिएशन, पेज इंडस्ट्रीज, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट, या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॉक डील झाल्या आहेत. मॅक्स हेल्थकेअर कंपनीमध्ये 1098 कोटी रुपये मूल्याचे 6 ब्लॉक डील पूर्ण झाले. मागील आठवड्यात मॅक्स हेल्थकेअर कमोनीचे शेअर्स 0.9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ITC कंपनीच्या शेअरमध्ये 10 ब्लॉक डील पार पडल्या होत्या. 59.83 लाख शेअर्सची ब्लॉक डील सरासरी 436 रुपये किमतीवर झाली होती. या ब्लॉक डीलचे एकूण मूल्य 261 कोटी रुपये होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.