
Adani Enterprises Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्टॉक मार्केटने तेजीने उसळी घेतली होती. बुधवारी दुपारी 2 वाजेनंतर बीएसई सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 78700 अंकांवर पोहोचला होता. एनएसई निफ्टी मध्ये सुद्धा १०० अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, वेंचुरा ब्रोकिंग फर्मने अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे
अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअरची सध्याची स्थिती
बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअर 1.01 टक्क्यांनी वाढून 2,554.20 रुपयांवर पोहोचला होता. अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 3,743.90 रुपये होता, तर अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 2,025 रुपये होता. अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,94,737 कोटी रुपये आहे.
अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअर टार्गेट प्राईस
वेंचुरा ब्रोकिंग फर्मने अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. वेंचुरा ब्रोकिंग फर्मने अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 3801 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. वेंचुरा ब्रोकिंग फर्मच्या मते ही टार्गेट प्राईस अदानी एंटरप्रायजेस शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा 51 टक्क्यांनी जास्त आहे. सध्या अदानी एंटरप्रायजेस कंपनीवर 80,427 कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक आहे.
अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअरने 7.59% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 3.95% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअर 19.78% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 12.44% घसरला आहे. मागील ५ वर्षात अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअरने 1,126.21% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 0.48% घसरला आहे. लॉन्ग टर्ममध्ये अदानी एंटरप्रायजेस शेअरने 42,118.18% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.