13 December 2024 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरने अल्पावधीत दिला 95% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक तेजीत येणार

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने गुजरातमधील खवडा सोलर पार्कमध्ये 2,000 मेगावॅट क्षमतेचा सोलर पॉवर प्लांट सुरू केला आहे. यासह अदानी ग्रीन एनर्जी कंपनी 10,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता असलेली भारतातील सर्वात पहिली कंपनी बनली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. ( अदानी ग्रीन एनर्जी अंश )

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा पोर्टफोलिओ 10,934 MW क्षमतेचा देशातील सर्वात मोठा पोर्टफोलिओ बनला आहे. 2024 या आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 2,848 मेगावॅट नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती क्षमता जोडली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 0.27 टक्के वाढीसह 1,896 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या ऑपरेटिंग पोर्टफोलिओमध्ये 7,393 MW सोलर पॉवर, 1,401 MW विंड एनर्जी आणि 2,140 MW सोलर-विंड हायब्रिड क्षमता सामील आहे. 2030 पर्यंत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 45 GW अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता साध्य करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.

मागील 5 दिवसांत अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 3.39 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा 10,934 MW क्षमतेचा ऑपरेटिंग पोर्टफोलिओ 5.8 दशलक्ष घरांना वीज पुरवठा करत आहे. यामुळे दरवर्षी 21 दशलक्ष टन CO2 उत्सर्जन कमी होत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 05 April 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x