
Adani Group Shares | हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर जे आरोप केले होते, त्यावर सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञ समितीने अदानी समुहाला ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यामुळे अदानी समुहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. हिंडनबर्ग फर्मचा अहवाल आल्यानंतर अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी एंटरप्रायझेस, कंपनीचे शेअर्स कोसळले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीने क्लीन चिट दिल्यानंतर
आता सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीने क्लीन चिट दिल्यानंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये विदेशी कंपन्यांद्वारे करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या कथित उल्लंघनाबाबत सेबीने केलेल्या तपासात कोणतेही तथ्य सापडले नाही.
हिंडनबर्ग आरोपानंतर शेअर्स क्रॅश झाले होते
हिंडनबर्ग फर्मने केलेल्या आरोपानंतर अदानी समूहातील कंपनीचे शेअर्स क्रॅश झाले होते. त्यात गुंतवणुकदारांना जबरदस्त तोटा सहन करावा लागला. अदा॒नी ग्रीन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना हैराण केले होते. मात्र आता या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत सुधारणा पाहायला मिळत आहे.
अदानी ग्रीन शेअर्स
मागील 6 महिन्यांत अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स क्रॅश झाल्यावर 462 रुपये पर्यंत खाली आले होते. मात्र आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 988.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी ट्रान्समिशन शेअर
अदानी समूहाच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील तज्ञांनी काही गुणांसह विश्लेषण केले आहे. अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरवर तज्ञांनी आर्थिक आघाडीवर 3 सकारात्मक आणि 5 नकारात्मक गुणांची रेटिंग दिली आहे. मालकीच्या बाबतीत तज्ञांनी या स्टॉकवर 2 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गुणांची रेटिंग दिली आहे. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत तज्ञांनी 1 नकारात्मक आणि 2 सकारात्मक गुणांची रेटिंग दिली आहे.
तज्ञांच्या मते मूल्य आणि किंमत या दोन्ही आघाडीवर अदानी ट्रान्समिशन स्टॉक अयशस्वी ठरला आहे. तज्ञांनी 6 नकारात्मक आणि फक्त 2 सकारात्मक गुण देऊन अदानी ट्रान्समिशन स्टॉकवर गुंतवणूक न करण्याची शिफारस केली आहे. अदानी टोटल कंपनीचे शेअर्स देखील आपल्या स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत आर्थिक, मालकी, मूल्यांकन, किंमत आणि कामगिरी या सर्व बाबीवर अयशस्वी रेटिंग मिळाले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.